गून्हापोलिसविशेषशहरसामाजिक

कर्जत येथिल व्यक्तीची ११ लाख ७५ हजार रुपयाची फसवणुक करणारे ०२आरोपी पिंपरी चिंचवड सायबर कडुन ताब्यात घेऊन गुन्हा उघड..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ जूलै २०२४ सायबर सेल येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार सुरज शिंदे यांना बातमीदारा मार्फत गोपनिय माहीती मिळाली होती की वेगवेगळया बँकेत एक अज्ञात इसम रोज वेगवेगळया व्यक्तीला घेऊन येतो आणि त्यांचे बँक अकाऊंट काढुन घेतो. त्यावरुन आम्ही तपास केला असता सदर व्यक्तीने सीटी युनियन बँकेचे बॅक अकाऊंट काढले असल्याची माहीती मिळाली. सदर सीटी बँक अकाऊंट होल्डरची माहीती घेतली असता सदरचे बँक अकाऊंट सतिष सुरेश बुंदेले रा. बी – ११, मोरेश्वर विहार, गोलांडे इस्टेट, लिंक रोड, गावडे पंपाजवळ, चिंचवड, पुणे- ४११०३३. अशी माहीती मिळुन आल्याने आम्ही सदर बँक अकाऊंट धारकाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्याने सांगीतले की त्याचा मित्र नामे परेश गुलाब बिरदवडे रा. बी-७, सृष्टी अर्पाटमेंट, जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे – ४११०३३. याने सदरचे बँक अकाऊंट काढायला लावुन त्या बदल्यात त्याच्याकडुन ऑनलाईन पैसे स्विकारले असल्याचे सांगीतले. त्यामुळे तात्काळ परेश गुलाब बिरदवडे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांकडे सायबर सेल, पिंपरी चिंचवड येथे कौशल्यपुर्वक तपास करता त्यांनी सीटी बॅके येथे काढलेले बँक अकाऊंटचा वापर कर्जत येथिल एका व्यक्तीस शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सांगुन जास्तीत जास्त पैसे मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन तीची एकुण ११,७५,०००/- रु ची फसवणुक करण्याकरीता केला असलेबाबत माहीती मिळाली. त्याबाबत अधिक माहीती घेतली असता सदरबाबत कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं १९०/२०२४, भादवि कलम ४१९, ४२० सह माहीती तंत्रज्ञान अधिनियक ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयात दोघांचाही सहभाग निष्पन्न झाला असल्याने १) सतिष सुरेश बुंदेले रा. बी-११, मोरेश्वर विहार, गोलांडे इस्टेट, लिंक रोड, गावडे पंपाजवळ, चिंचवड, पुणे ४११०३३ २) परेश गुलाब बिरदवडे रा. बी-७, सृष्टी अर्पाटमेंट, जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे – ४११०३३ यांना दाखल गुन्हयाचे पुढील तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन, जि. रायगड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तांत्रिक तपास सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी व पोशि २३०० सुरज शिंदे, पोशि २५६३ अतुल लोखंडे हे करीत होते. त्यांनी तांत्रिक तपास केला असता यातील आरोपी यांनी वेगवेगळया बँकेचे अकाऊंट सायबर फसवणुक करण्यासाठी काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी
काढलेल्या बँक अकाऊंट विरुध्द भारत भरातुन एकुण ४० तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड, मा. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोहवा ८४४ दिपक भोसल, पोशि २५६३ अतुल लोखंडे, पोशि २५६२ नितेश बिचेवार, पोशि ४०७८ सुरज शिंदे (सर्व नेमणुक सायबर सेल ) यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!