पूर्ववैमनस्यातुन कोयत्याने वार करुन खुन करणारे आरोपींना महाळुंगे पोलीसांनी ४८ तासामध्ये ठोकल्या बेडया..
महाळुंगे पोलीसांची कामगिरी : खुनाचे कटात सहभागी आरोपीसह ७ जनांना अटक
प्रतिनिधी महाळुंगे दि. ०६ जूलै २०२४ मौजे खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे येथील इसम नामे गणेश अनिल उर्फ आण्णा तुळवे, वय ३० वर्ष हे त्यांचा भाचा प्रणय प्रदिप तुळवे वय २१ वर्ष यांचेसह दिनांक ०१/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०७:०० वा चे सुमारास महाळुंगे बाजुकडुन खालुंब्रे बाजुकडे मोटार सायकल वरुन जाताना एच.पी. चौक नजिक दबा धरुन बसलेल्या विशाल पांडुरंग तुळवे व त्याचे साथीदारांनी पुर्ववैमनस्यातुन गणेश तुळवे याचेवर हल्ला करुन त्याचे डोक्यावर पाठीमागील बाजुस कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुन खुन केला. त्यावेळी त्यास सोडविणेसाठी मध्ये येणारा गणेश याचा भाचा
प्रणय ओव्हाळ याचेवर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने चढवुन आरोपी रिक्षामधुन फरार झाले होते. सदर घटनेवरुन महाळुंगे एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ४१९ / २०२४, भा. न्या. सं. कलम १०३ (१), १०९, २४९, ३(५), आर्म ॲक्ट ४ २५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३, ७ म.पो. अधि.क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हाचे गांभीर्य ओळखुन लागलीच परिमंडळ -३चे पोलीस उप आयुक्त श्री. शिवाजी पवार, चाकण विभागचे सहा. पोलीस आयुक्त श्री. राजेंद्रसिंह गौर यांनी गुन्हयाचे तपास संदर्भाने सुचना मार्गदर्शन केले. त्यानुसार महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना सुचना देवुन
३ पथके तयार करुन आरोपीचे शोधा करीता रवाना केले. खुन करुन फरार झालेले आरोपी लोणावळा मार्गे मुंबई येथे गेल्याबाबत तांत्रिक पुरावे व गोपनिय बातमीचे आधारे माहित झाल्याने तपास पथक मुंबई येथे पोहचे पर्यंत आरोपींनी तेथुन पसार झाले होते. आरोपींचे ठावठिकाण्याबाबत काहीएक माहिती प्राप्त नसताना शोध पथकातील पोहवा / तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदार यांचे मार्फत माहिती प्राप्त झाली की, सर्व आरोपी हे मौजे जांबवडे, ता मावळ जि पुणे येथे एका घरात लपुन बसले आहेत. प्राप्त माहितीचे आधारे वपोनि नितीन गिते यांनी शोध पथकाचे मदतीला सपोनि कल्याण घाडगे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पाठवुन आरोपींना लपलेल्या घरातुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपींची नावे
१) विशाल पांडुरंग तुळवे, वय ३७ वर्ष, राहणार खालुंब्रे, ता-खेड जि पुणे
२) मयुर अशोक पवार, वय ३० वर्ष राहणार समता कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता खेड जि पुणे
३) रणजित बाळु ओव्हाळ वय २२ वर्ष, राहणार खालुंब्रे ता खेड जि पुणे,
४) प्रथम सुरेश दिवे वय २१ वर्ष राहणार द्वारकासिटी, महाळुंगे, ता खेड जि पुणे
५) विकास पांडुरंग तुळवे, वय ३५ वर्ष, राहणार खालुंब्रे, ता-खेड जि पुणे
६) चंद्रकांत भिमराव तुळवे, वय ३८ वर्ष, राहणार खालुंब्रे, ता-खेड जि पुणे
७) सनी रामदास तुळवे, वय २६ वर्ष, राहणार खालुंब्रे, ता-खेड जि पुणे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा श्री संदिप डोईफोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- ३ डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्री. राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन गिते, सहायक पोलीस निरीक्षक श्री कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, अमोल बोराटे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर यांनी केली असुन गुन्हयाचा तपास सपोनि कैलाश कुथे हे करीत आहेत.