गून्हापोलिसमहाराष्ट्रशहरसामाजिक

अपह्रत व्यक्तीचा खुन करुन फरार झालेल्या आरोपींस एम. आय. डी. सी. भोसरी पोलीसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजि. नं. ८४ / २०२४ दि. १६/०६/२०२४ प्रमाणे दाखल मिसिंग मधिल मिसिंग व्यक्ती नामे अमिर मोहम्मद शेख वय २५ वर्षे रा. आदर्शनगर, मोशी, पुणे. मुळ रा. रांधे ता. पारनेर, जि. अहमदनगर हा दि. १५/०६/२०२४ रोजी राहते घरातुन कंपनीत कामाला जातो असे सांगुन निघुन गेला. तो परत घरी न आल्याने त्याबाबत त्याची पत्नी अरीना अमीर शेख हीने एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन येथे तीचे पती मिसिंग झाले बाबत तक्रार दाखल केली होती. सदर मिसिंगचा तपास करत असताना तपासामध्ये यातील मिसिंग व्यक्ती नामे अमिर मोहम्मद शेख यास त्याचा साडू पंकज विश्वनाथ पाईकराव, रा. मार्तंडनगर, चाकण मुळ रा. भिंगे आडगाव, ता हिंगोली, जि-हिंगोली याने फोन करुन बोलावुन घेतले होते. त्यावरुन अमिर मोहम्मद शेख याचे वडील नामे मोहम्मद कासिम शेख वय ५० वर्षे, धंदा – शेती रा, मु.पो – रांधे सज्जनवाडी, ता- पारनेर, जि – अहमदनगर यांनी त्यांचा मुलगा अमीर शेख यास त्याचा साडु – पंकज विश्वनाथ पाईकराव, रा. मार्तंडनगर, चाकण, पुणे व सुन निकीता / अरीना हीच्या माहेर कडील लोकांनी रा. रांधे, ता- पारनेर, जि अहमदनगर यांनी त्यांची मुलगी निकीता / अरीना सोबत त्यांच्या मनाविरुध्द लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलगा आमीर शेख यास आदर्शनगर, मोशी पुणे येथुन जबरदस्तीने जिवीताचे बरे वाईट करण्यासाठी अपहरण करुन कोठेतरी घेवुन गेले आहेत. त्याबाबत मोहम्मद कासिम शेख. याने पंकज विश्वनाथ पाईकराव, वय २८ वर्षे रा. मार्तंडनगर, चाकण, पुणे, मुळ गाव – भिंगे आडगाव, ता हिंगोली, जि – हिंगोली व सुनेच्या माहेरच्या लोकांच्या विरुध्द तक्रार दिल्याने त्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे पिं.चिं. गुन्हा रजि. नं. ३२५ / २०२४ भा. दं. सं. कलम ३६४, ३४ प्रमाणे दि. २७/०६/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यामध्ये १) पंकज विश्वनाथ पाईकराव, वय २८ वर्षे रा. मार्तंडनगर, चाकण, पुणे मुळगाव- भिंगे आडगाव, ता हिंगोली, जि – हिंगोली व २ ) सुशांत गोपाळा गायकवाड वय २२ वर्षे रा. रांधे, ता- पारनेर, जि अहमदनगर. ३) गणेश गायकवाड रा. रांधे, ता. पारनेर जि. अहमदनगर हे आरोपी असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने आरोपी नं. १) पंकज विश्वनाथ पाईकराव, वय २८ वर्षे रा. मार्तंडनगर, चाकण, पुणे मुळगाव- भिंगे आडगाव, ता हिंगोली, जि-हिंगोली. यास त्याचे मुळ गाव भिंगे आडगाव, ता हिंगोली, जि- हिंगोली. व आरोपी नं. २ ) सुशांत गोपाळा गायकवाड वय २२ वर्षे रा. रांधे, ता- पारनेर, जि- अहमदनगर. यास लोणावळा येथुन ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्ह्यात दिनांक २९/०६/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी यांना नमुद गुन्ह्यात अटक करुन त्यांचेकडे चौकशी केली असता नमुद आरोपी हे दि. १५/०६/२०२४ रोजी बी. के. खोसे डांबर प्लॅन्ट कंपनी, मुर्‍हेवस्ती, कुरुळी, ता. खेड जि. पुणे चे शेजारील मंदीरात एकत्र बसुन यातील अपह्रत इसम नामे अमीर मोहम्मद शेख याचे अपहरण करुन त्यास जीवे ठार मारणे बाबतचा कट रचला.
त्याप्रमाणे आरोपी पंकज पाईकराव याने यातील अपहत इसम अमीर शेख यास दारु पिण्याचे बहाण्याने फोन करुन बोलावुन घेवुन त्यास कुरुळी जवळील पुणे नाशिक हायवे वरील एका हॉटेलमध्ये नेऊन दारु पाजली. त्यानंतर तेथुन अमीर शेख हा नाणेकरवाडी येथे एका कंपनीत कामावर गेला असता त्यास वरील तीन ही आरोपींनी वेगवेगळ्या गाडीवर जावुन त्याचा पाठलाग करुन आरोपी पंकज याने अमीर शेख यास पुन्हा दारु पिण्याचे बहाण्याने फोन करुन बोलावुन घेवुन आळंदी फाटा येथील एका हॉटेल मधुन दारु घेवुन ते दोघे चाकण आळंदी रोडचे कडेला मेदनकरवाडी गावचे हद्दीतील जंगलात दारु पित बसले.
त्यावेळी त्यांचे पाठीमागुन आलेल्या आरोपी नामे सुशांत गोपाळा गायकवाड व गणेश दिनेश गायकवाड. (पाहीजे असलेला आरोपी) यांनी पंकज यास फोन करुन बाजुला जाणेस सांगुन त्या दोघांनी यातील अपह्त इसम नामे अमीर मोहम्मद शेख यास मारहाण करत जंगलात ओढत नेऊन त्याचे डोक्यात दगड घालुन त्यास जीवे ठार मारले.
त्यानंतर त्याची मयत बॉडी जंगलात लपवुन ठेवली. त्यानंतर सदर मयत बॉडी जाळण्यासाठी वरील आरोपी बी. के. खोसे डांबर प्लॅन्ट कंपनी, मु-हेवस्ती, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे. या कंपनीत येवुन यातील आरोपी न. ४ नामे सुनिल किसन चक्रनारायण वय ३३ वर्षे धंदा- हेल्पर रा. मुईरोड, चिबळी फाटा, मुर्‍हेवस्ती चाकण पुणे याने सदर बॉडी जाळण्यासाठी लागणारे एल. डी. ओ. डिझेल सदर कंपनीचे टाकीतुन काढुन दिले. (त्यास सदर गुन्ह्यात दि. ०३/०७/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे). त्यानंतर आरोपी नामे सुशांत गोपाळा गायकवाड वय २२ वर्षे रा. रांधे, ता- पारनेर, जि – अहमदनगर. व गणेश दिनेश गायकवाड (पाहीजे आरोपी) रा. रांधे, ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी ते एल. डी. ओ. डिझेल मयतावर टाकुन त्यास जाळुन टाकले. त्यानंतर दि.१७/०६/२०२४ वरील आरोपी नामे सुशांत गोपाळा गायकवाड व गणेश दिनेश गायकवाड यांनी पुरावा नष्ट करण्याचे हेतुने मयताची हाडे व राख दोन वेगवेगळ्या गोण्यात भरुन ते नदीत टाकुन दिले. आरोपी यांनी अपह्त व्यक्तीचा खुन करण्याचा कट रचुन त्यास जीवे ठार मारुन पुरावा नष्ट केल्याने सदर गुन्ह्यास भा.दं.वि. कलम ३०२, २०१, १२० ( ब ) प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री विनयकुमार चौबे साो. मा. अप्पर पोलीस आयुक्त सो वसंत परदेशी, मा.पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार साो. परि-०३, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सचिन हिरे साो. एम. आय. डी. सी. भोसरी विभाग, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पानसरे, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, राजू जाधव, संजय जरे, स्वप्निल शेलार, गणेश बो-हाडे, राहूल लोखंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रविण मुळुक, नितिन खेसे, विशाल काळे, आनंद जाधव, अक्षय क्षीरसागर यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!