आंदोलनमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

सामाजिक न्याय विभागाकडून पिंपरी विधानसभा क्षेत्रात संवाद यात्रा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ जूलै २०२४ सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार विभागाकडून शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी आयोजित केलेली संवाद यात्रा (पदयात्रा ) काल रविवार दि.०७ जुलैला पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये संपन्न झाली.
पिंपरी विधानसभा क्षेत्रात आठ प्रभागांमध्ये दर रविवारी होणारी संवाद यात्रा काल
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून दत्तवाडी आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संवाद यात्रेचा प्रारंभ झाला पुढे आकुर्डी विठ्ठल मंदिर, आकुर्डी हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर, शनी मंदिर, काळभोर नगर असा मार्गक्रमण करीत गाय-वासरू चौक मोहन नगर या ठिकाणी पदयात्रेचा समारोप झाला.
या पदयात्रेत चालताना विद्यार्थी, तरुण, महिला, कामगार, कष्टकरी वर्ग, आबालृद्ध यांच्यासह अनेकांशी संवाद साधत पिंपरी विधानसभा मधील अनेक प्रश्न दैनंदिन अडचणी समजून घेत लोकांशी चर्चा करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की वाढती महागाई, तरुणांमधली बेरोजगारी व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी यासारख्या प्राथमिक सुविधांचा देखील अभाव आहे. अगदी अशाच प्रकाराचे अनेक नागरिक आपले म्हणणे पदयात्रेमध्ये सांगत होते. विद्यमान आमदारांकडून मागचे प्रलंबित काम देखील पूर्ण झाले नाही असा नागरिकांचा सूर अनुभवास मिळाला.
या पदयात्रेचा उद्देश आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांनी केलेली काम आणि पक्षाचे चिन्ह पोहोचवण्यासोबत वातावरणाची निर्मिती देखील होत आहे.
या पदयात्रेच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे मुख्य समन्वयक गणेश अण्णा भोंडवे, ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, सेवा दलाचे अध्यक्ष अरुण थोटे, असंघटित विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, महिला शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, युवक अध्यक्ष इमरान शेख, शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, पिंपरी विधानसभा माजी अध्यक्ष विशाल काळभोर, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष कविताताई कोंड, लहुजी शक्ती सेना अध्यक्ष लहू अडसूळ, शाबाद खान, तुषार गाडे, सचिन सकाटे, विकास रंधवे, सुरज देवगिरी, आजिनाथ सकट, शंकर खवळे, संदीप जाधव, संतोष माळी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत अनेक कार्यकर्ते मित्रपरिवार उपस्थित होते. यावेळी आयोजक शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी सामाजिक न्याय विभागाकडून सर्व उपस्थितांचे स्वागत व आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!