गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भरदिवसा महिलांच्या गळयातील मंगळसूत्र खेचणाऱ्या परप्रांतीय अट्टल गुन्हेगारास अटक करून, चैन चोरीचे ०२ व वाहन चोरीचा ०१ असे ०३ गुन्हे उघडकीस.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ जूलै २०२४ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चैन चोरीच्या घटना दाखल होत्या. त्याबाबत मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेतील पथके व युनिट यांना चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
चिखली परिसरातील रस्त्याने पायी जाणाऱ्या एकटया महिलांना पाहुन त्यांच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या घटना दिनांक १४/०७/२०२४ व दिनांक १६/०७/२०२४ रोजी घडल्या होत्या.
त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडील दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अधिकारी व अंमलदार यांनी चिखली पोलीस ठाणे हद्दीत दोन दिवसामध्ये घडलेल्या घटनास्थळी भेटी देवुन, घटनास्थळ तसेच त्याचे आजुबाजुचे परिसरातील जवळपास १२५ ते १५० सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करून, संशयीत इसमाचा येण्याचा व जाण्याचा मार्गे काढला असता, सदर इसम हा चिखली परिसरात
भरदिवसा एकटा गुन्हे करत असल्याचे निर्देशनास आले. त्याअनुषंगाने कुदळवाडी व चिखली परिसरात वेगवेगळी पथके तयार करून संशयीत इसमाचा दोन दिवस शोध घेत असताना दिनांक १६/०७/२०२४ रोजी पोलीस उप निरीक्षक गोसावी, पोशि समीर रासकर व अमर कदम यांना एक इसम संशयीतरित्या विनानंबर प्लेट स्प्लेंडर मोटार सायकल वरून कुदळवाडी परिसरात येताना दिसला, त्याचा पाठलाग करून, त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्याचे नाव मोनुकुमार ललन बिंद, वय २२ वर्षे, रा. पवारवस्ती, चिखली, पुणे मुळगाव गाव सोनहरिया, कलवड, भोलेनाथ मंदिराचे समोर कोतवाली गाजीपुर, उत्तरप्रदेश असे असल्याचे समजले. व त्याचे ताब्यातील मोटार सायकल ही चोरीचे असल्याचे आढळुन आले. आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पाहुन त्याचेकडे बारकाईने विचारपुस केली असता त्याने चिखली परीसरात चैन चोरी केल्याचे आढळुन आले. त्याचे कडे चौकशी करता त्यांनी पुढील गुन्हे केल्याचे कबुल केले.
१) चिखली पोलीस ठाणे गुरनं ४०४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ ( ४ )
२) चिखली पोलीस ठाणे गुरनं ४०७ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ ( ४ )
तसेच त्याचे ताब्यातील चोरीचे मोटार सायकल बाबत अधिक तपास सुरू आहे. पुढील तपास कामी नमुद आरोपीस चिखली पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहेत. सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी साो, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, गणेश कोकणे, अमर कदम व समीर रासकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!