महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भोसरी गुळवेवस्ती येथे मुह्हरम निमित्त शाह जमात शान ऐ फकीर फाउंडेशन यांच्या वतीने शरबत वाटप..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ जूलै २०२४ मुह्हरम हा एक मुस्लिम सण आहे. हा सण इस्लाम धर्मानूसार नूतन वर्षारंभ म्हणून मानला जातो. मोहरम दिनानिमित्त भोसरी गुळवेवस्ती येथे शाह जमात शान ऐ फकीर फाउंडेशन यांच्या वतीने सर्व मुस्लिम समाजाला शुभेच्छा देऊन मोहरम निमित्त शरबत वाटप करण्यात आले तसेच इमाम हुसैन यांच्या आठवणी ना उजाळा देण्यात आला. या वेळी शाह जमात शान ऐ फकीर फाउंडेशन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अतहर भाई शाह, सलोखा सोशल फाउंडेशन हरीश डोळस, सालार भाई शेख, सलमानी जमात हरून भाई शेख, सरफराज शेख, ख्वाजा नदाफ, जाहीद भाई शाह, अजहर शाह, मोहसीन भाई शाह, मोहम्मद शाह, असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन शाह जमात शान ए फकीर फाऊंडेशनचे वतीने करण्यात आले समारोप व आभार प्रदर्शन मोहसीन शाह यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!