कृषीदुतांनी दिली बचत गटाच्या महिलांना नवीन दिशा..
प्रतिनिधी निमसाखर, दि. १६ जूल २०२४ निमसाखर, ता. इंदापूर येथे बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी पपई जाम बनवण्याबद्दल जाधव मळा येथे बचत गटाच्या महिलांना माहिती दिली व कृतीतून मार्गदर्शन केले.
महिला बचत गट म्हणले की एकत्र येऊन पैसे गोळा करून सदस्यांना मदत करणे या पलीकडे जाऊन एकत्रित येऊन पदार्थ बनवून त्याची विक्री केली तर रोजगार व उत्पन्न मिळू शकेल हीच गरज ओळखून कृषीदुतांनी महिलांना पपई जाम बनवण्याचे मार्गदर्शन केले. यासाठी पपई, साखर, सायट्रिक ऍसिड या गोष्टी गरजेच्या असतात.
कृती: जॅम तयार करण्यासाठी सर्वप्रथम पपई धुवून घ्यावी व कापावी , बिया वेगळ्या कराव्यात व साल काढून घ्यावी. पपईच्या बारीक फोडी करून मिक्सरमध्ये सगळी फळं एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. एका पसरट भांड्यात साखर पेस्ट मंद आचेवर शिजवावी. मिश्रणाला उकळी फुटेपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत रहावे. हळूहळू मिश्रणामधे साखर टाकावी व त्यानंतर सायट्रिक ऍसिड टाकावे. मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल. मिश्रण शेवटपर्यंत ढवळत राहावे. जॅम पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावा. मिश्रण जॅम स्वरुपात आले आहे असं वाटलं की गॅस बंद करा. तयार जॅम थंड झाल्यानंतर एका हवाबंद बरणीमध्ये पॅक करून ठेवावा.
अश्या प्रकारे पपई जॅम बनवून त्यांची विक्री करून त्यातून नफा कमवू शकतो यामुळे बचत गटाचा महिलांना रोजगार भेटू शकतो.
सदर प्रात्याक्षिकास महिलांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला याप्रसंगी कृषी सहायक श्रद्धा घोडके , सहकारी शेतकरी राजेंद्र पवार, बचत गट अध्यक्ष विद्या जाधव व इतर ४३ महिला उपस्थित होत्या. कृषीदुत ऋषिकेश बनसोडे, योगेश घोडे, शंतनु गावंडे, प्रथम बिरादार, चैतन्य भोसले, अनंत हरक, ओमकार भिलारे, नितांत भोसले हे डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांच्या व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत.