महाराष्ट्रराजकीयविशेषशहर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची तातडीची बैठक पूण्यात संपन्न..

प्रतिनिधी पूणे दि. १८ जूलै २०२४ पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवार १८ जुलै २०२४ रोजी पक्षातील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सन १९८६ ते २०२२ पर्यंतच्या सर्व माजी नगरसेवक नगरसेविका यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते एकूण १२० माजी नगरसेवक बैठकीस उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. बैठकीत मा. ना. अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन करताना उपस्थितितांना संबोधित केले. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून सर्वांनी काम केले पाहिजे, पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील असले पाहिजे, राज्याला विकासाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी आम्ही महायुतीच्या वतीने वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेत आहोत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा त्याचाच एक भाग आहे.
एस.सी.,एस.टी. तसेच अल्पसंख्याक, ओबीसी, तसेच इतर समाजामधील कुटुंबातील मुले-मुली हे शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत, त्या योजना राबविण्यासाठी व त्यांची अंमलबजावणीसाठी आपण व आपली संघटना तत्पर असली पाहिजे.
रविवार, दिनांक २१ जुलै २०२४ रोजी चिंचवड येथील रागा पॅलेस येथे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळाव्यापूर्वी आदरणीय दादा हे प्रत्येक आजी-माजी नगरसेवक सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी व्यक्तिशः बोलणार आहेत.
सदर बैठकीस आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगलाताई कदम, मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, महंमद पानसरे, प्रशांत शितोळे, फजल शेख, अपर्णाताई डोके, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, शाम लांडे, मयुर कलाटे, मारेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, प्रभाकर वाघेरे, युवक अध्यक्ष शेखर काटे, शमीम पठाण, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, ओबीस सेल अध्यक्ष विजय लोखंडे, सतीश दरेकर, पंडीत गवळी, नाना लोंढे, प्रकाश सोमवंशी, रोहित उर्फ आप्पा काटे, स्वाती उर्फ माई काटे, अनुराधा गोफणे, महिला निरिक्षक शितल हगवणे, ॲड.गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, चंद्रकांत वाळके, प्रवीण भालेकर, वैशाली काळभोर, मंदा आल्हाट, संजय औसरमल, नारायण बहिरवाडे, राजेंद्र जगताप, राजेंद्र साळुंखे, संतोष कोकणे, उषा उर्फ माई काळे, निकीता कदम, संतोष बारणे, माया बारणे, कैलास बारणे, राजू बनसोडे, बन्सी पारडे, सुजित पाटील अरूण टाक, सुषमा तनपुरे, विजय कापसे, अतुल शितोळे, रामभाऊ पिंपळे, प्रसाद शेट्ठी, माऊली सुर्यवंशी, मंगला जाधव, तानाजी खाडे, रेखा गावडे, संदिप चिंचवडे, निलेश डोके, मीना नाणेकर, अल्फान्सा डॅनिस, शांती सेन, मुक्ता पडवळ, सचिन औटे, बबन गाढवे, अंकुश पठारे, मनोज खानोलकर, उत्तम आल्हाट, राजू लोखंडे, चंदा लोखंडे, चंद्रकांत तापकिर,अमिना पानसरे, मनिषा पवार, जगन्नाथ साबळे, काळुराम पवार, छाया साबळे, माधुरी मुलचंदाणी, ईश्वर ठोंबरे, रमा ओव्हाळ, सुभद्रा ठोंबरे, नम्रता लोंढे, एकनाथ मोटे, सन्नी ओव्हाळ, सुखदेवी नाटेकर, भाऊसाहेब सुपे, अंकुश पठारे, प्रशांत फुगे, नवनाथ नढे, दिपक साकोरे, अकबर मुल्ला, महेश झपके, कविता खराडे, गंगा धेंडे, पल्लवी पांढरे, मनिषा गटकळ, सारिका पवार, सुनिता अडसूळ, पूनम वाघ, शोमा पगारे, ज्योती गोफणे, बापू कातळे, अभिजीत आल्हाट, अतिश बारणे, शिरिष साठे, शाम जगताप, तानाजी जवळकर,प्रशांत सपकाळ, बाळासाहेब गोतारणे, महेश भागवत, बळीराम जाधव, संजय आहेर, गणेश सस्ते, देविदास गोफणे, सुरेखा लोंढे, सतिश चोरमले, संजय जगताप, प्रदीप गायकवाड, सुनिल अडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!