रविवार, दि. २० जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा “कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० जूलै २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) “कार्यकर्ता संकल्प मेळावा” रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आजी माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वैयक्तिक भेट घेण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार सकाळी ०८:०० ते ११:०० यावेळेत रागा पॅलेस, काळेवाडी येथे उपस्थित असणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा “कार्यकर्ता संकल्प मेळावा” रागा पॅलेस, बी.आर.टी. रोड, काळेवाडी येथे सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यास सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने करण्यात आले आहे.