स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यात जिजाऊंचे मोलाचे योगदान : सतीश काळे
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त लांडेवाडी भोसरी येथे अभिवादन.
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ जानेवारी २०२५ स्वराज्य निर्मितीच्या स्वप्नांची बीजे बाल शिवाजीराजे यांच्या मनात पेरण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले त्यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने रयतेचे स्वराज्य उभे केले स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचे मोलाचे योगदान आहे. असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त लांडेवाडी भोसरी येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले जिजाऊंच्या स्मारकास संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष वसंत पाटील संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष दिनेश मराठे सचिव मंगेश चव्हाण उपाध्यक्ष निरंजनसिंह सोखी सहसचिव नारायण बिरादार छावाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बिट्टू पाटील, गणेश देवराम, उत्तम मोरवेकर, गणेश अवताडे, संतोष बोराळे, योगेश जाधव, उमेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काळे म्हणाले की ज्या काळी शूद्रांना राजा होण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी ब्राह्मणी व्यवस्थेला जुगारून स्वराज्याच देखणं स्वप्न पाहून जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना राजनीती युद्ध कलेचे शिक्षण दिले आणि पुत्राप्रमाणेच नातवावर म्हणजेच छत्रपती संभाजी राजांवर उत्तम संस्कार करणारी जिजाऊ माता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ दृढनिश्चय संयम धर्माबद्दल आदराची भावना निस्वार्थीपणा योद्धा वृत्ती उदार मन निर्भयता नेतृत्व धैर्य युद्धनीती त्यागाची वृत्ती तसेच विजयाची इच्छा असे बहुमुखी गुण होते. राष्ट्राप्रती समर्पणाचे बीज पेरून जिजाऊंनी शिवाजीराजांना एक आदर्श राजा बनवले. आज अनेक महिला अथर्वशीर्ष पठण करायला बसतात मात्र महिलांना सक्षम बनविणाऱ्या आदर्श राजाचे आणि जिजाऊंचे योगदान महिला विसरत आहेत. महिलांनी जिजाऊ, सावित्री माई, माता रमाई, अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करायला हवा. ते होत नाही याची खंत आहे असे काळे म्हणाले.