प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.. १३ जानेवारी २०२५ राजमाता जिजाऊ यांचा १२ जानेवारी १५९८ जन्म दिवस या निमित्ताने राजमाता जिजाऊ जयंती दिनी बालाजीनगर, भोसरी येथे त्यांचा जन्मदिन सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजमाता जिजाऊच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे, सहकारी रामभाऊ ओव्हाळ, तुकाराम गव्हाणे, मा. लक्ष्मण खरात, आयु. सावित्री शिंदे, आयु. मालणताई सिरसट, आयु. आशाबाई शेरखाने, मा. शिंगाडेताई देवीई, आयु. शितोळेताई, सृष्टी शिंदे, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.