
प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड दि. १५ जानेवारी २०२५ लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ९९ व्या जयंती निमित्त श्री. देवस्थान संस्था घणसोली, आणि लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरण कृती समिती मार्फत रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
महाराष्ट्र राज्य वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. सुमारे ३७ जणांनी रक्तदान करून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या संघर्षमय कार्यकाळाला मानवंदना दिली. या प्रसंगी मा. नगरसेवक उत्तम म्हात्रे, मा. नगरसेवक घनःश्याम मढवी, मा. नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, गावकी अध्यक्ष सीताराम मढवी, सरचिटणीस मंगेश म्हात्रे, पत्रकार सतिश वि. पाटील, घणसोली ग्रामस्थ, २९ गाव संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते, मुंबई, नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात दि. बा. समर्थकांनी उपस्थितीत राहून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या लढाऊ, झुंझार व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उजाळा दिला. असा प्रामाणिक व सर्वसामान्य, निस्वार्थ लोकनेता होणे नाही.