यादे याद आती है “आरे” ऐकेकाळी ड्रिम प्रोजेक्ट होता..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. १३ जानेवारी २०२५ गेले दोन तीन दिवस ‘आरे मिल्क डेरी’ बाबत फोटो विडिओ व्हायरल होत आहेत, खरंच अखेरचा तुला दंडवत असे विडिओला ब्रॅग्राऊड गाणे जोडले आहे आणि सर्व कारखाना उध्वस्त झालेला दिसतोय, तर काहींनी लिहीले ‘गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी पण आता त्या देखील इतिहास जमा झाल्या ! ‘आरे’ काॅलनी नावाने बेस्ट चालत होती आरेतून जाताना बर्याच ठिकाणी जंगली प्राण्यांपासून सावध रहा असे बोर्ड दिसत होते. आता ‘आरे’ ही लुप्त आणि बोर्डही जंगली प्राणी तर शहरात भटकताना दिसले माकडे तर आजही मुलुंड नाहूरगावात येतात त्याचे जंगल विकासाच्या नावाने उध्वस्त झाले, मागिल काही वर्षांत तर चिता बस मधून मुलुंड स्टेशन पर्यंत आला होता. तसेच साईप्रस व विना नगर भागात ही सोसायटीत चिता cctv कॅमेऱ्यात फिरताना दिसत होता आता जंगलच नाही ? तर जंगली प्राणी कुठे दिसणार? जंगल बचाव अदोलन ही काही निसर्ग प्रेमींनी केले पण सरकार पुढे सर्व व्यर्थ ठरले ! काही वर्षांत जंगल व जंगलातील प्राणी, पक्षी फक्त पुस्तकातच दिसणार की काय असा प्रश्न उपस्थित होतो!
“आरेच्या आठवणीला उजाळा!
बॉम्बे मिल्क कमिशनरने दारा खुरोडी या असिस्टंट कमिशनरला शेतकऱ्यांना समजवण्यास पाठवले पण खुरोडींनी पोल्सनला वगळून थेट सोसायटीतून दुध घेण्याचा सल्ला मिल्क कमिशनरला दिला. नंतरच्या काळात पोल्सन -कैरा सोसायटी-दारा खुरोडी या सर्वांमध्ये अंतर्गत राजकारण सुरु झाले. यातूनच कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटीचे (अमूल) आणि दारा खुरोडी यांच्या कुरबुरीतूनच ‘आरे’ मिल्क कॉलनीचा जन्म झाला. १९६१ साली या कॉलनीचे पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते उदघाटन झाले होते.
त्या काळी ‘आरे’ कॉलनीचे दुग्धोत्पादन दिवसाला तीन लाख लिटर पर्यंत पोहचले होते. आपले संपूर्ण आयुष्य दूग्धोत्पादन व्यवसायाला वाहून घेतलेल्या दारा खुरोडींना पुढे १९६३ साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हायची होती. तेव्हा गुजरातहून मुंबईला दुध यायचे. १९६० साली गुजरातसह महाराष्ट्राची स्थापना झाली आणि हे दोन कट्टर विरोधक वेगवेगळ्या राज्यात गेले. मुंबईत आरे तर गुजरातमध्ये कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटी आपआपले काम करू लागले. पण पुढे आरेचा फारसा विकास झाला नाही आणि आरे मागे पडलं.