गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषसामाजिक

आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणार्‍या अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेने केले हस्तगत..

प्रतिनिधी पूणे सासवड दि. २४ जूलै २०२४ सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५८ / २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ (१), ३(५) आर्म अॅक्ट ३,२५,२७ प्रमाणे दि. १९/०७/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील जखमी नामे राहुल नामदेव टिळेकर वय ३८ वर्षे, रा. सोळंकी टॉवर्स सासवड ता. पुरंदर जि पुणे याचे सासवड एसटी स्टँड समोर श्रीशा’ज ” आईस्क्रीम पार्लर असून दि.
१८/०७/२०२४ रोजी दुपारी ०३ / ३० वा. राहुल टिळेकर हा त्यांचे आईस्क्रीम पार्लर मध्ये काउंटरवर बसलेला असताना दोन अनोळखी इसमांनी दुकानात येवून आईस्क्रीम घेतली व आईस्क्रीम खाऊन झाले नंतर त्यापैकी एकाने राहुल टिळेकर याचेवर बंदुकीतून एक गोळी झाडली ते दोघे अनोळखी इसम रोडवरील त्यांचे तिसऱ्या साथीदाराचे मोटार सायकलवर बसून
पळून गेले. वगैरे मजकूराची फिर्याद विजय नामदेव टिळेकर याने सासवड पोलीस स्टेशन येथे नोंदविली आहे.
सासवड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी फायरींग झाल्याने ताबडतोब मा. पोलीस अधीक्षक, श्री पंकज देशमुख सो. पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, सासवड पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करून घटनास्थळालगतचे सीसीटीव्ही तपासून आरोपींचे मोटार सायकलचा माग काढून आरोपी ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या. तपासकामी नेमण्यात आलेल्या पथकांनी संयुक्तरीत्या फिर्यादी याचेकडे विचारपूस केली असता, राहुल टिळेकर याने प्रताप जगताप व त्याचे पत्नीचा नेहमी होणारा कौटुंबिक वादविवाद बऱ्याच वेळी मिटविला होता, त्यामुळे प्रताप जगताप हा राहुल टिळेकर याचेवर चिडून होता. जखमी राहुल टिळेकर याचे प्रताप जगताप, अजय जगताप, दयानंद जगताप यांचे सोबत वाद झाला होता, त्यादरम्यान “आमचे कौटुंबिक वादात पडू नको, नाहीतर राहुल टिळेकर यास गोळया घालीन” अशी धमकी जगताप भावंडांनी विजय टिळेकर याचे जवळ दिली होती. त्यामुळे फिर्यादी व जखमी यांचा जगताप भावंडांनीच सदरचा गुन्हा करणेसाठी अनोळखी इसम पाठविले आहेत. असे तपासात समोर आले. स्था. गु.शा. व सासवड पो. स्टे. कडील तपास पथकांनी गुन्हयाचे अनुषंगाने गोपनीय बातमीदाराचे बातमीवरून आरोपी नामे १) अजय संभाजी जगताप वय ४२ वर्ष, २) दयानंद संभाजी जगताप वय ३५ वर्षे, ३) प्रताप संभाजी जगताप वय ३८ वर्षे, तिघे मुळ रा. मांडकी ता. पुरंदर
जि. पुणे ४) सुजल तमन्ना आंबेघर वय २० वर्षे, रा. चंदननगर, खराडी पुणे ५) सुमित कमलाकर वाघमारे वय १९ वर्षे, उंड्री होलेवस्ती, पुणे यांना अटक करणेत आलेली असून सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून आरोपींकडून दोन गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतूस असा एकूण एक लाख पाच हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. सदर गुन्हयात ६) एक विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न असून त्याला देखील रखवालीत घेण्यात आलेले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करणेत आलेली आहे.
जखमी राहुल टिळेकर याचेवर नोबेल हॉस्पीटल पुणे येथे उपचार चालु आहेत. गुन्हयात आणखी तीन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांचा शोध चालु असून त्याकरीता दोन पथके रवाना करणेत आलेली आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. एस. डी. पी. ओ. श्री. तानाजी बरडे, भोर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सासवड पो स्टे चे पो नि ऋषीकेश अधिकारी, स्था. गु.शा. चे सपोनि योगेश लंगुटे, राहूल गावडे,
पोसई प्रदीप चौधरी, अमित सिद-पाटील, सासवड पो. स्टेचे सपोनि नितीन अतकरे, पोसई अतुल खंदारे, श्रीराम पालवे, अर्जुन चोरगे, स्था.गु.शा.चे अंमलदार बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, राजू मोमीन, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, अमोल शेडगे, अक्षय सुपे, सासवड पो स्टे चे अंमलदार निलेश जाधव, सुरज नांगरे, लियाकत मुजावर, प्रतिक धिवार, वैभव मदने, विकास ओंबासे, तेजस शिवतरे यांनी केली असून पुढील तपास सासवड पो स्टे चे पो नि ऋषीकेश अधिकारी हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!