आर्थिकगून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषसामाजिक

केडगाव चौफुला येथील जबरी चोरीचा गुन्हा १२ तासांचे आत उघडकीस आणून एका आरोपीस ताब्यात घेवून ४५ लाख रूपये केले हस्तगत..

प्रतिनिधी पूणे यवत दि. २४ जूलै २०२४ यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ७४९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दि. २४/०७/२०२४ रोजी दाखल आहे. दि. २३/०७/२०२४ रोजी फिर्यादी शरद मधुकर डांगे वय ७६ वर्षे रा. चैतन्य वाडी बुलढाणा ता. जि. बुलढाणा हे त्यांची सुन व व्याही यांचे सोबत रघुनंदन हॉटेल, चौफुला केडगाव येथे रात्रौ ०९वा सुमारास जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांचे सोबत असलेल्या बंडू ऊर्फ गजानन काळवाघे याने फिर्यादीस चाकू दाखवून ‘जमीनीचे व्यवहारातून विसार म्हणून मिळालेली पन्नास लाख रूपये असलेली पैशाची बॅग त्यांचे चारचाकी वाहनातून जबरदस्तीने काढून घेवून पळून गेला वगैरे बाबत फिर्यादीने वरीलप्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे व यवत पो स्टे चे पथकाने घटनास्थळी भेट दिली. यातील फिर्यादीकडे विचारपूस केली असता, फिर्यादी शरद डांगे यांची सुनबाई हिचे वडीलांची कर्नाटक इंडी या गावात जमीन होती. सदर जमीनीचा व्यवहार बंडु ऊर्फ गजानन काळवाघे यांनी विरभद्र कट्टी रा. इंडी कर्नाटक यांचेसोबत जमवून दिला. एकूण १८ एकर क्षेत्राचे व्यवहारात ५० लाख रूपये ॲडव्हान्स घेण्यात आला होता. फिर्यादी शरद डांगे, त्यांची सुनबाई, व्याही, बंडु काळवाघे असे त्यांचे कडील चारचाकी वाहनातून इंडी येथून पुण्याकडे येत असताना केडगाव चौफुला येथे जेवण करणेसाठी थांबले तेंव्हा सदरचा प्रकार घडला आहे. अशी माहिती दिल्याने तपास पथकांनी बंडू काळवाघे याचा व त्यांचे सोबतचे इतर दोन अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तांत्रिक विश्लेषणाद्वारे बंडू काळवाघे हा केडगाव न्हावरा रोडने शिरूर बाजूकडे जात असल्याचे माहिती मिळाल्याने त्याचा पाठलाग सुरू करणेत आला, स्थानिक गुन्हे शाखेचे शिरूर विभागातील पथक व शिरूर पोलीस स्टेशनचे मदतीने न्हावरा फाटा या ठिकाणी सापळा लावणेत आला. आरोपी नामे बंडू ऊर्फ गजानन सुरेश काळवाघे, वय ४० वर्षे रा. बुलढाणा, चैतन्यवाडी ता. जि. बुलढाणा यास न्हावरा फाटा येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याचेकडून गुन्हयात चोरी केलेली ४५ लाख रूपये रक्कम हस्तगत करणेत आलेली आहे.
आरोपी बंडू ऊर्फ गजानन काळवाघे वय वर्षे रा. बुलढाणा, चैतन्यवाडी ता.जि. बुलढाणा यास अटक करणेत आलेली असून त्याची पोलीस कोठडी रिमांड मिळणेकामी त्यास मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. एस. डी. पी. ओ. श्री. आण्णासाहेब घोलप, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पो. स्टे. चे पो. नि. नारायण देशमुख, स्था. गु.शा. चे सपोनि राहूल गावडे, पोसई अमित सिद-पाटील, पोसई प्रदीप चौधरी, यवत पो स्टेचे सपोनि प्रविण संपांगे, शिरुर पो.स्टे चे पोसई अभिजीत पवार, स्था. गु.शा. चे अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, संजू जाधव, असिफ शेख, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, धीरज जाधव यवत पो स्टे चे अंमलदार भानुदास बंडगर, रामदास जगताप, महेंद्र चांदणे, राजीव शिंदे, दत्ता काळे, प्रमोद गायकवाड, विकास कापरे, गणेश मुटेकर, शिरूर पो स्टेचे अंमलदार नारायण जाधव, विकी यादव, तसेच नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण येथील मपोसई भाग्यश्री जाधव, महिला अंमलदार बी एन दळवी, पोहवा चंद्रकांत भोसुरे यांनी केली असून पुढील तपास यवत पो स्टेचे हे सपोनि प्रवीण संपांगे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!