अतिवृष्टी मूळे नद्या तूडूंबभरून वाहत आहेत. पालिकेने मदती करिता नदी किनारी सुरक्षा रक्षक उभे करावेत-भाग्यदेव घुले
बोपखेल (रामनगर- गणेशनगर) भागातून मुळा – मुठा नदी वाहते नदिच्या तिरालगत मानव वस्ती असल्याने नदी किनार्यावरती सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्या बाबत इ- प्रभाग अधिकारी श्री. राजेश आगळे यांना भाग्यदेव घुले यांचेवतिने निवेदन देण्यात आले आहे.
तरी पालिका अधिकार्यांनी यावर लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यावा. कारण मुळा-मुठा नदी काठी पाण्याची पातळी वाढत आहे पिंपरी चिंचवड शहरात आजुन दोन तिन दिवस सतत पाऊस जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितले आहे.
आशा वेळी मुळा-मुठा नदी मध्ये विविध भागातुन पाणी सोडलं जाते व नदीच्या पाण्याची पातळीत ही वाढ होत असल्या मुळे उपनगरात पाणी शिरायला वेळ लागणार नाही.
मागिल वेळी पावसाळ्यात अनेक घरात पाणी शिरले होते हे लक्षात घेवून त्वरित उपाय योजना कराव्यात. याबाबत आपण योग्य ती खबरदारी म्हणुन सुरक्षेच्या दुष्टिने उपाययोजना करावी
असे निवेदन इ-प्रभाग अधिकारी श्री. राजेश आगळे यांना देण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते भाग्यदेव घुले यांनी सांगीतले.