कारगिल विजयदिनानमित्त ‘भोसला परिवारा’ कडून शूरवीर योद्यांना मानवंदना..
प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. २७ जुलै २०२४ कारगिल विजयदिनानमित्त भोसला परिवारा कडून शूरवीर योद्यांना मानवंदना वाद्यवृदांच्या तालावर छात्रांचे शानदार पथसंचलनः आकर्षक सजावटीबरोबरच अश्वांचाही सहभाग नाशिक सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित भोंसला मिलिटरी स्कूल, भोसला मिलीटरी कॉलेज आणि गर्ल्स स्कूलतर्फे कारगिल विजयदिना निमित्त युद्धात शहिद झालेल्या शूरवीर जवानांना आज मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने शहर परिसरात वाद्यवृंदाच्या साथीने काढण्यात आलेल्या रॅली, पथसंचलनाने सर्वांचेच लक्ष वेधले, शिस्तबध्द संचलन, आकर्षक सजावट व अश्वांचा सहभागही उल्लेखनीय ठरला.
आपल्या समाजबांधवांना तसेच नव्या पिढीला सैनिकांनी देशासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीची माहिती मिळावी, या उद्देशाने दरवर्षी कारगिल विजय दिन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून आज रॅली काढण्यात आली. यात पंधराशेहुन अधिक रामदंडीनी आपला सहभाग नोंदवला.
शाळेच्या आवारातील शहीद स्मारकास प्रमुख अतिथी कर्नल विवेक कुमार यांच्यासह संस्थेचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य, स्कूलचे कमांडट संदीप पुरी यांच्याहस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. भोसला स्कूल (मुले व मुली) आणि कॉलेजच्या छात्रांनी संचलन करत मानवंदना दिली. यावेळी संस्थेच्या नाशिक विभागाचे सहकार्यवाह आनंद देशपांडे, कोषाध्यक्ष राहुल वैद्य, स्कूलचे चेअरमन शितल देशपांडे, सदस्य नरेंद्र वाणी, ॲड. सुयोग शहा, सदस्या आसावरी धर्माधिकारी, सुवर्णा दाबक, सौ.मिथीला देशपांडे, वसुधा कुलकर्णी, डॉ.धनश्री हरदास, कॉलेज कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजयप्रसाद अवस्थी आदीसह प्राचार्य, युनिट विभागप्रमुख शिक्षक आदी उपस्थित होते. कर्नल विवेक कुमार यांनी कारगिल विजय दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. रौप्य महोत्सवी वर्षाची आठवण करून देत म्हणाले, कारगिल युध्द हे स्मरणात राहणारे युध्द आहे, समर्पण, त्याग, निष्ठा याचे हे प्रतिक म्हणता येईल, कॅप्टन विजय बत्रासह इतरांनी प्राणाची आहुती देत यात आपल्याला विजय मिळवून दिला. कठीण परिस्थितीत मात करत जिद्द, चिकाटीचे दर्शन आपल्या कामगिरीतून दाखवले हे आपल्यासाठी गौरवास्पद बाब म्हणता येईल. सहकार्यवाह देशपांडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, राष्ट्र प्रथम या तत्वांवर संस्थेची वाटचाल सुरु असून युवापिढीमध्ये संरक्षणविषयक गोडी निर्माण करण्याबरोबरच देशभक्ती व राष्ट्रनिष्ठा जागविण्याचे काम संस्था करत आहे, यावेळी देशपांडे यांनी कारगिल युध्दात जवानांनी बजावलेल्या कामगिरीचा गौरव केला. कादंबरी कदम यांनी सुत्रसंचालन केले, कर्नल पुरी यांनी आभार मानले.
कॉलेजच्या रॅलीने भारावले वातावरण..
तत्पुर्वी हुतात्मा स्मारकात सीएमए देशपांडे, श्री.पगारे, कर्नल संदीप पुरी यांच्या उपस्थितीत स्कूलच्या रॅलीला सुरवात झाली तर डोंगरे वसतिगृहाच्या ठिकाणाहुन काढलेल्या कॉलेजच्या रॅलीला कोषाध्यक्ष राहुल वैद्य, डॉ. विजयप्रसाद अवस्थी, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांनी ध्वज दाखवला, तर गर्ल्स स्कूलच्या रॅलीला सहकार्यवाह आनंद देशपांडे, सदस्या सुवर्णा दाबक, आसावरी धर्माधिकारी यांनी ध्वज दाखवत रॅलीस झाली. ढोलपथक अश्वांसह तिरंगा, कारगिल युध्दातील जवानांच्या फलकांनी लक्ष वेधले, रस्त्यांने जाणारे प्रत्येकजण कुतुहलाने या छात्राकंडे पाहत होते. विविध देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शहीद स्मारकांच्या ठिकाणी सजावट, पथसंचलन गंगापूर रोड स्मारकांच्या ठिकाणी भोसला मिलीटरी कॉलेजने तिरंगा लावण्याबरोबरच आकर्षक फुलांच्या सजावटीसह सर्व व्यवस्था केली होती. देशभक्तीपर गीतांनी परिसर गजबजला होता. या पथसंचलनातही भोसला कॉलेजच्या सर्व छात्रांनी भाग घेतला, या ठिकाणी संस्थेचे कार्यवाह मिलिंद वैद्य यांनी पुष्पचक्र अर्पण केले. शहर व परिसरातील वेगवेगळ्या मार्गांनी १५०० विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. यामध्ये भोंसला मिलिटरी स्कूल मुले, मुली, कॉलेजचा छात्राचा समावेश होता. स्कूलच्या आवारात शहीद स्मारकास मानवंदना देण्यासाठी एकत्रित झाले.
चौकट
शिशुविहार बालकमंदीरमध्ये लष्करी साहित्याचे प्रदर्शन
कारगिलदिनानिमित्त संस्थेच्या शिशुविहार व बालकमंदीरमध्ये कार्यक्रम झाला. आपण कारगिल दिवस का साजरा करतो? याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यानिमित्ताने लष्करी शस्त्रे आणि लष्करी वाहतूक यांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन साकारण्यात आले होते. कारगिल दिनाचा इतिहास आणि आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांवर आधारित चित्रफित विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. त्यानंतर शाळेच्या शहिद स्मारक येथे विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्षा मिथिला देशपांडे, मुख्याध्यापक राजन चेट्टीयार, पर्यवेक्षिका राखी दुबे, जया डगळे यांचे मार्गदर्शन लाभले.