हिंदी विषयाची कार्यशाला नंदिकेश्वर विद्यालयात संपन्न..
प्रतिनिधी इंदापुर दि. २७ जुलै २०२४ श्री. नंदीकेश्वर विद्यालय जंक्शन येथे पंचायत समिती इंदापुर, मुख्याध्यापक संघ व इंदापुर हिंदी अध्यापक संघ यांच्या वतीने आज हिंदी शिक्षकांसाठी एक दिवसाची कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी संघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र रणमोडे यानी केले. अनुमोदन श्री सुधाकर भोंग यानी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री. पाटील जे. एन. होते, प्रमुख पाहुणे श्री. सोलसे सर, श्री. मचाले सर, श्री. डोंबाले सर, प्रमुख पाहुणे होते.
प्रथम सत्रात श्री. मुसा नवाब सर यानी व्याकरण व कृतिपत्रिका या संदर्भात मार्गदर्शन केले दूसर्या सत्रा मध्ये श्रीमती डॉ. शीतल माने मॅडम यानी नवीन शिक्षा नीती या विषयी मार्गदर्शन केले.
तिसरे सत्र श्री. चव्हाण सर यानी उपयोजित लेखन या बाबत मार्गदर्शन केले. चौथे सत्र श्री. उस्मान मुलाणी यांनी हिंदी परीक्षा बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री. संजीव पांढरे सर यानी केले
या कृति सत्रांत इंदापुर, बारामती येथिल ७१ शिक्षकानी भाग घेतला होता.