पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

दिव्यांगाच्या उन्नती करता सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेचा “दिव्यांग समूह” तयार..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. 04 फेब्रुवारी 2026 सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना. महाराष्ट्र राज्य. या सामाजिक संघटनेच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर, महानगरपालिका क्षेत्रात काम करण्यासाठी ” दिव्यांग व्यक्तीच्या संरक्षणासाठी व त्यांच्या उत्कर्ष आणि विकासाच्या दृष्टीने, ” दिव्यांग समूह ” या नांवाची संघटना दिनांक २६ जानेवारी २०२६ , प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली.
काल दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी बालाजीनगर भोसरी पुणे 26 येथील होतकरु, शिक्षीत, युवक सुनील ऊर्फ साजन लक्ष्मणराव लष्करे यादिव्यांगाची निवड व नियुक्ती दिव्यांग समूह या सामाजिक संघटनेच्या शहर कार्यकारिणी मध्ये पिंपरी चिंचवड शहरांच्या अध्यक्ष पदी करण्यात आली.
तसे नियुक्ती प्रमाण पत्र सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या संस्थापक भिमरत्न, प्रा. बी. बी. शिंदे आणि याच सामाजिक संघटनेच्या राज्य कार्यकारिणी मधील सह संघटक आयु. रामभाऊ गिरजाप्पा ओव्हाळ यांचे हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
या निवडीचे सर्व सामाजिक स्तरातून सुनील ऊर्फ साजन लक्ष्मणराव लष्करे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!