आरोग्यमहाराष्ट्रमूंबईशुभेच्छाशैक्षणिकसामाजिक

नवीमुंबई (गोठीवली) येथील पहीली एम. डी. डॉक्टर..

प्रतिनिधी सतिश वि.पाटील मुंबई दि. २७ एप्रिल २०२५ नवीमुंबई (गोठवली) गावातील पहीली एम.डी.डॉक्टर तेजल पाटील हिने अथक मेहनत व परिश्रम घेऊन एम.डी. ड्रीग्री मिळवली. विशेष म्हणजे लग्न झाल्यावर स्त्रिला चूल आणि मुल हे समीकरण जूळवताना नाकीनऊ येते. आणि खरंच प्रपंचात पडल्यावर खूप मोठी जवाबदारी स्त्रियांच्या खांद्यावर असते. एक आपण आपले माहेर सोडून सासरी गेलेलो असतो नवीन घर नवीन माणसं पण तसं न होता सासू-सासरे, नवरा यांनी पुढील शिक्षणात मदत करतील का? जर केलीच तर त्या कष्टाला यश येईल का?पण याला अपवाद ठरली तेजल. हीचे प्राथमिक शिक्षण ऐरोली येथील सेंट झेवियर्स स्कूल मधून झाले. पुढे नाशिक येथील सप्तशृंगी वैद्यकीय महाविद्यालयातून बीए.एम.एस. (एमडी) ची पदवी संपादन केली. या तीच्या कार्याचे कौतुक सर्व स्थरांतून होत आहे. इच्छाशक्ती व मेहनत याच्या बळावर आपण निश्चित यशवंत होतो हे आजच्या पिढीला एक चांगला मेसेज समाजात जात आहे. अभिनंदन डाॅ. तेजल पाटील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!