पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा म्हणून आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांना पिंपरी चिंचवड मधील घंटागाडी व ध्वनिमुद्र द्वारे जनजागृती करण्यासाठी निवेदन..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ ऑगस्ट २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. जांभळे पाटील साहेब यांना काल भरारी फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले की लवकरच गणपती उत्सव सुरू होणार आहे. तरीही पिंपरी चिंचवड मध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती साठी कुठलीही जाहिरात केली गेली नाही. पिंपरी चिंचवड मध्ये पर्यावरण पूरक म्हणजे शाडू माती व लाल मातीच्या गणपती मूर्तीचीच सर्व नागरिकांनी घरात व सर्व मंडळात स्थापना करावी. त्या करिता महापालिकेने लवकरात लवकर आदेश काढावा. व पी.ओ.पी. च्या मूर्ती वर पिंपरी चिंचवड मध्ये बंदी आणावी जर का बाजारात पीओपीच्या मुर्त्या आढळल्या तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. दरवर्षी महापालिकेकडून मूर्तिकारांना शेड उपलब्ध होतात पण त्यांना परमिशन देताना खात्री केली पाहिजे की स्टॉलवर पर्यावरण पूरकच गणपती आहेत का? तशी खातरजमा करूनच परवाना द्यावा. गणेशोत्सवाकरिता जास्तीत जास्त महिला बचत गटांना शेड उपलब्ध करून द्यावे व आर्थिक पाठिंबा देऊन महिलांचे मनोबल वाढवावे. अशा स्वरूपाची मागणी भरारी फाउंडेशनच्या वतीने काल निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून सहकार्याची भावना दाखवली व जाहिरातीच्या माध्यमातून लवकरच पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही जनजागृती सुरू करू असा शब्द दिल्याचे आशा इंगळे यांनी सांगीतले.