पुणे येथे संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न..
भारतीय संविधान हे भारतीयांचे संरक्षण कवच आहे – राजन नायर
प्रतिनिधी पूणे दि. ०२ ऑगस्ट २०२४ भारतीय संविधान हे या देशाचा सर्वोच्च कायदा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलेले आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. भारतीय संविधान अद्वितीय आहे कारण त्यात केवळ लोकांच्या अधिकारांचाच उल्लेख नाही तर त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचाही उल्लेख आहे. भारतीय संविधान वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीचे संतुलन ठरवते.
भारतीय राज्यघटनेतील कलम २५ वर आधारित मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा सामाजिक कार्यकर्ते श्री राजन नायर यांनी पुणे शहरातील हार्बर हॉल येथे आयोजित केली होती. यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्च न्यायालयातील नामवंत वकिल यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यशाळेत उपस्थितांना संबोधित करताना लीगल ॲक्शन ख्रिश्चन कमिटी चा राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. राजन नायर सर यांनी मूलभूत हक्क, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषण विरोधी हक्क, धार्मिक स्वातंत्र्य या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा केली.
या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून युवकांनी येऊन त्याचा लाभ घेतला व प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन केले पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक निकाळजे, प्रदीप चांदेकर, क्रिस्टोफर रॉड्रिक्स, प्रसाद मामिडी, जॉन अब्राहम, डेव्हिड रत्नम, सॅम्युअल घोलप, डेव्हिड काळे, मेरी रॉड्रिक्स, मनोज मिसाळ, रमेश आल्हाट, ॲड डॅनियल ताकवले, अशोक पठारे आदी उपस्थित होते. किरण पगारे, बेंजामिन काळे, मायकेल राज नाडर, सि. मेरी एंगेजमेंट, जोशुआ रॉड्रिग्ज, बसवराज घुहिगल, विकी कांबळे, नितीन सारसर, मुरली नायर, अविनाश वाघमारे, प्रवीण वाघमारे, निकिता कांबळे, कालेब रॉड्रिग्ज, प्रिया नीकराजे, यो. साळवे, कोमल कट्टीमणी, स्मृती जाधव, अविनाश धिवर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यशाळा यशस्वी केली.