
पिंपरी-चिंचवड
यामध्ये वनप्लस, सॅमसंग, ओपो, अशा महागडया कंपनीचे मोबाईल फोन
एकुण किंमत २,२०,०००/- रुपयांचे हस्तगत करण्यात आलेले आहेत.
दि. २१.०३.२०२३ रोजी भोसरी पोलीस ठाणे येथे मा.पोलीस उप-आयुक्त सो परिमंडळ- १,
पिंपरी चिंचवड यांचे वार्षिक निरिक्षणा दरम्यान गहाळ झालेल्या एकुण १७ मोबाईलचे तक्रारदार
यांना भोसरी पोलीस ठाणेस समक्ष बोलावुन मा. श्री. विवेक पाटील सो, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-
१ पिंपरी चिंचवड यांचे हस्ते तक्रारदार यांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल हॅण्डसेट परत देण्यात आलेले आहेत.
सदर कामगिरी मा. श्री. विवेक पाटील सो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, पिंपरी चिंचवड, मा. श्रीमती प्रेरणा कट्टे सो सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पो ठाणे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सागर जाधव यांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन स.पो.नि. कल्याण घाडगे, पो.उप.नि. मुकेश मोहारे, सफौ राकेश
बोयणे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, धोंडिराम केंद्रे, आशिष गोपी, प्रभाकर खाडे,
संतोष महाडिक, तुषार वराडे, सचिन सातपुते, स्वामी नरवडे, महिला पोलीस अंमलदार प्रतिभा मुळे
यांनी सदरची उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.



