गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पोलीस स्टेशन वाकड खून झाल्याचे निष्पन्न करुन परागंदा झालेल्या आरोपीस ०४ तासात अटक..

प्रतिनिधी पिंपरीचिंचवड दि. ०९ डिसेंबर २०२३ दिनांक ०७/१२/२०२३ रोजी ससुन हॉस्पीटल पुणे येथून एम. एल. सी. नं. ३०३४७/२०२३ अन्वेय माहिती प्राप्त झाली की, दि. ०२/१२/२०२३ रोजी पेशंट नामे योगेश जगन्नाथ सुर्वे, वय ४० वर्षे यास काळेवाडी फाटा येथे मारहाण झाल्याने पेशंट औंध हॉस्पीटल येथे प्रथम उपचार झाल्यानंतर त्यास पुढील दवाउपचारकामी ससुन हॉस्पीटल येथे
ॲडमिट करण्यात आले होते. सदर पेशंट नामे योगेश सुर्वे हे दि.०६/१२/२०२३ रोजी रात्री १०.०० वा. उपचारादरम्यान मयत झाले आहेत अशी खबर प्राप्त झाल्याने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या अधिनस्त तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर घटनेचे शहानिशा करुन चौकशी करणेबाबत आदेश दिले. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनकडील एक अधिकारी व अंमलदार असे ससून हॉस्पीटल येथे मयताबाबत पुढील कार्यवाही करणेकामी रवाना करण्यात आले.
मयत योगेश सुर्वे याचा प्राप्त फोटो व अपुर्ण नाव एवढीच माहिती सुरुवातीला प्राप्त होती. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे काळेवाडी फाटा येथे जाऊन चौकशी सुरु केली. काळेवाडी फाटा येथील रिक्षावाले, फेरिवाले, दुकानदार यांना मयताचा फोटो दाखवून त्याचेबाबत माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु मयतास कोणीही ओळखत नव्हते. काळेवाडी फाट्यापासून काही अंतरावर असणाऱ्या गजानन नगर येथील मोकळ्या जागे
शेजारी मयत याचा फोटो दाखवून चौकशी करीत असताना एक फिरस्ता ज्याचे नाव छत्तीस (मुळचा छत्तीसगडचा असल्याने त्याला छत्तीस म्हणतात) याने मयताचा फोटो बघत तो ड्रायव्हर असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मयत ज्या
ठिकाणी टेम्पोवर ड्रायव्हर म्हणुन काम करत असे तेथे जाऊन चौकशी केली असता मयत योगेश सुर्वे हा एकटाच मिळेल त्या ठिकाणी राहत असे व ड्रायव्हर म्हणुन काम करत असे, तसेच त्याला पत्नी होती परंतु अनेक वर्षापासुन तो फिरस्ता राहतो अशी माहिती प्राप्त झाली.
मयताबाबत माहिती प्राप्त झाल्याने त्याची दिनांक ०२/१२/२०२३ रोजी कोणासोबत भांडणे झाली होती. याबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी तेथील स्थानिक रहिवाशी, फिरस्ते, कामगार यांचेकडे विचारपुस केली परंतु कोणासही भांडणाबाबत माहिती नव्हते. तपास पथक गजानन नगर येथे चौकशी करीत असताना एक लहान मुलगा पोलीस काय चौकशी करतात हे पाहण्यासाठी आला असता त्याला मयत सुर्वे याचा फोटो दाखविला असता त्याने मयत हा त्याच भागातील ड्रायव्हर असल्याचे सांगत त्याला सनीने काहि दिवासांपुर्वी मारले होते असे सांगितले.
सदर लहान मुलाकडून सनी कोठे राहतो याबाबत विचारले असता त्याला सनीचा भाचा जो त्याचे वयाचाच आहे याचे फक्त नावाच माहित होते. त्यामुळे परत तपासात अडचण निर्माण झाली. सनीचा भाचा याबाबत माहिती काढण्यासाठी त्या परिसरातील काही लहान मुलांना बोलावले असता त्यापैकी एका लहान मुलाला त्याचे घर माहित होते. त्यानंतर सदर लहान मुलाच्या साहाय्याने त्याच्या घरी गेलो असता सनीची बहिण घरी मिळून आली.
तिच्याकडे विचापुस केली असता सनिचे नाव अनिकेत ऊर्फ सनी रमेश काळे, वय २६ वर्षे, रा. अशोकनगर झोपडपट्टी, मॉडेल हायस्कुलशेजारी, वाशी नाका, चेंबुर, मुंबई असे समजले. त्याचे बहिणीला दिनांक ०२ / १२ / २०२३ रोजी सनीचे एका व्यक्ती बरोबर भांडण झाल्याचे माहित होते व सनीने त्या व्यक्तीस मारहाण केली होती त्यामुळे सनी ०३ / १२ / २०२३ रोजी चेंबुर, मुंबईला परत गेला होता. त्यामुळे सदरचा गुन्हा अनिकेत ऊर्फ सनी काळे याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मा. वरिष्ठांची परवाणगी घेऊन चेंबुर, मुंबई येथे जाऊन तांत्रिक व पारंपारिक पध्दतीने तपास करुन अशोकनगर झोपडपट्टीमधील अनिकेत ऊर्फ सनी काळे याला ताब्यात घेतले.
आरोपी अनिकेत ऊर्फ सनी काळे याच्याकडे दिनांक ०२/१२/२०२३ रोजी झालेल्या प्रकाराबाबत विचारणा करता त्याने सांगितले की, तो आणि मयत योगेश जगन्नाथ सुर्वे, वय ४० वर्षे, रा. नखाते नगर, रहाटणी, पुणे हे एकत्र असताना मयत योगेश सुर्वे याने त्याला शिवीगाळ केल्याचे कारणावरुन त्यांचेत किरकोळ वाद झाल्याने त्याने मयत योगेश सुर्वे यास लाथा बुक्यांनी पोटावर, छातीवर व पाठीवर मारहाण केली. त्याने केलेल्या मारहाणीमध्ये मयत योगेश सुर्वे यास जबर दुखापत झाल्याचे त्याला जाणीव होती त्यामुळे तो चेंबुर, मुंबई येथे पळुन गेला होता.
तपास पथक झालेली भांडणे व आरोपी याबाबत तपास करत असताना पोउपनि रोहित दिवटे व स्टाफ मयत योगेश सुर्वे याचे पुढील कार्यवाहीसाठी ससुन हॉस्पीटल पुणे येथे गेले होते. मयत योगेश सुर्वे याचे पोस्ट मॉर्टेम झाल्यानंतर ॲडव्हान्स सर्टिफिकेट मध्ये मयताचे मृत्युचे कारण पोटावर जब्बर मारहाण झाल्याने पोटाची आतडी फाटल्याने मयत झाला आहे असे प्राप्त झाले आहे. त्यामुळे झाले तपासाच्या आधारे व पोस्ट मॉर्टेम मधील मृत्युचे कारण यावरुन आरोपी अनिकेत ऊर्फ सनी काळे याने योगेश सुर्वे याचा शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरुन त्याला मारहाण करीत जबर दुखापत करत त्याचा खून केला आहे. असे निष्पन्न झाल्याने मयताचे कोणीही नातेवाईक
तक्रार देणेस उपलब्ध नसल्याने वाकड पोलीसांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन आरोपीविरुध्द् वाकड पोलीस ठाणेस गु.र.नं. ११७५ /२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे वाकड पोलीस ठाणे तपास पथक यांनी खून झालेल्या व्यक्तीचा फोटो व अपुर्ण नाव यावरुन कोणतीही इतर माहिती प्राप्त नसताना कोशल्यपुर्ण तपास करत चार तासाच्या आत मयताची ओळख पटवत आरोपी निष्पन्न करुन आरोपीस चेंबुर मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपी अनिकेत ऊर्फ सनी काळे यास दिनांक १३/१२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झाली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.श्री. डॉ. संजय शिंदे सह. पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी
चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि. रोहित दिवटे, सपोफौ बिभीषण कन्हेरकर,
सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ राजेंद्र काळे, पोहवा संदीप गवारी, पोहवा वंदु गिरे, पोहवा स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. राम तळपे, पोशि अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि कौंतेय खराडे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!