सामाजिक कार्यकर्ते श्री. राजन नायर यांचा प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश:
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ ऑगस्ट २०२४ पिंपरी चिंचवड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य काम करणारे उच्च शिक्षित, प्राध्यापक राजन नायर यांचा कॉंग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला.
यांच्या पक्ष प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड मध्ये येणार्या विधानसभा व महानरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नवचैतन्य मिळेल असे जाणकार सांगतात. या वेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष डाॅ. कैलास कदम व अल्पसंख्याक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांच्या मुळे राजन नायर यांनी पक्ष प्रवेश केला असल्याचे सांगीतले जाते.
राजन नायर यांच्या पक्ष प्रवेशामुळे महा विकास आघाडी मध्ये कॉंग्रेस पक्षाला चिंचवड विधानसभा मध्ये एक सक्षम उमेदवार मिळाला या दृष्टीने पाहिले जात आहे.
मागील ३७ वर्षे कॉंग्रेस मध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार्टीच्या काही कमजोरी मुळे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून महाराष्ट्र राज्य महा सचिव या पदावर काम केले. परंतु एक मन मिळवून, सर्वांना सोबत घेऊन, विशेषतः अल्पसंख्याक लोकांसाठी असलेला चेहरा, छत्रपती शिवाजीमहाराज, शाहू, फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी पुढे ठेवून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत घडविण्याचे काम पक्षाचे नेते राहुलजी गांधी करत आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून राजन नायर यांनी पक्ष प्रवेश घेतल्याचे समजते.
आज राहुल गांधी भाजपा व आर. आर. एस. यांच्या समोर निडर पणे उभे राहून संविधान वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राजन नायर यांनी पक्ष प्रवेश केला या मुळे पिंपरी चिंचवड शहर मध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे!
पूढे अशी ही चर्चा ऐकण्यात आली की नायर यांचा यावेळी होणारा काॅंग्रेस प्रवेश कदाचित चिंचवड विधानसभेच्या उमेदवारीची दावेदारी असावी. या संदर्भात लवकरच माहिती पूढे येईल.