कंत्राटी कामगार प्रथा आणि ०४ नव्या संहिता विरोधात, भव्य कामगार कर्मचारी आक्रोश मेळावा..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ ऑगस्ट २०२४ पिंपरी चिंचवड मधील संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृह येथे सकाळी ११:०० ते दुपारी ४ : ०० पर्यंत पार पडला.
यावेळी या कामगार आक्रोश मेळाव्याचे उद्घाटन मान्यवर नानासाहेब पटोले, प्रांतअध्यक्ष आय. काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश यांचे शुभ हस्ते उद्घाटन झाले. यावेळी, कामगार नेते, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, तसेच पिंपरी चिंचवड शहर जिल्हा आय. काँग्रेस अध्यक्ष – डॉ. कैलास कदम यांनी वरील विषया संदर्भात सविस्तर प्रस्तावना कंत्राटी कामगारांनी तूडूंब भरलेल्या सभाग्रहा समोर तळमळीने मांडली.
या आगोदर मान्यवर नानासाहेब पटोले यांनी पिंपरी चिंचवड शहर, जिल्ह्याचे काँग्रेस आयचे अध्यक्ष मा. डॉ. कैलास भाऊ कदम यांचे खराळ वाडी येथील काँगेस ऑफिसला भेट दिली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यामध्ये प्रामुख्याने मान्यवर राजन नायर यांनी जाहीरपणे पक्षात प्रवेश केला.
यावेळी मा. प्रा . बी. बी. शिंदे. संस्थापक/अध्यक्ष :-सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना,( महा. राज्य) आणि अध्यक्ष:–झोपडपट्टी सेल काँग्रेस आय, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा. यांनी मान्यवर नानासाहेब पटोले यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले, त्यावेळी डॉ. मनिषाताई गरुड यांनी या क्षणाची छायाचित्रे टिपली.