लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवा निमित्ताने लहान मुलांची डान्स स्पर्धा व अभिवादन कार्यक्रम संपन्न..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ ऑगस्ट २०२४ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठाण रावेत व भीमशक्ती युवा संघटना पि. चिं. शहर यांच्या विद्यमाने माता रमाबाई नगर रावेत येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव निमित्ताने लहान मुलांच्या डान्स स्पर्धा व अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला..
सदरील कार्यकमाचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष व भिमशक्ती युवा संघटनेचे महासचिव विकी पासोटे यांनी केले होते.
या कार्यकमाला प्रमुख उपस्थिती सोमनाथ शेठ भोंडवे, दीपक शेठ भोंडवे, राहुल कलाटे, विनोद गायकवाड, सुरज गायकवाड (युवक अध्यक्ष भिम शक्ती युवा संघटना), विद्याताई जाधव, राहुल मदने, अर्जुन सिंग पवार, अशोक गायकवाड, प्रवीण वाकोडे, दिपक भालेराव, संकेत जगताप, मनोज पवार, गणेश कसबे, दिनेश कसबे, मयूर गंगावणे, बंटी गंगावणे, पवन धकोलिया, नंदू कुचेकर, आदित्य शिंदे, समर्थ जाधव, कुणाल अल्हाट, ज्वेल कांबळे आदी कार्यकते उपस्थित होते.