अभिवादनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त निगडी येथे अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ ऑगस्ट २०२४ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निगडी येथे यमुना नगर ठाकरे ग्राउंड शेजारी अपंग शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अन्नदान करून साजरी करण्यात आली.
यावेळी सनी पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल कांबळे यांनी सांगीतले की महामानवांच्या जयंती निमित्त आम्ही अशाच स्वरूपाचे कार्यक्रम नेहमी घेत असतो. जयंती निमित्त अन्नदान, शैक्षणिक साहित्याची विद्यार्थ्यांना मदत करणे अशा रितीने जयंती. साजरी केली जाते.
या वेळी सनी पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल कांबळे, मुन्ना खान, इम्रान शेख, साहिल मांडेकर, जगन्नाथ बेरोजगार, कुणाल वडागळे, नन्या पवार व इतर ही मान्यवर उपस्थित होते.