ग्रामिण भागात मंदीरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद, पारगाव पोलीसांची कारवाई..
११ मंदीरात चोरीच्या गुन्हयांची उकल करुन ४,००,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त पारगाव (कारखाना) पोलीसांची उत्तम कामगीरी..
प्रतिनिधी पूणे ग्रामिण दि. ०६ ऑगस्ट २०२४ पुणे जिल्हयातील आंबेगाव, शिरूर, शिकापुर, रांजणगाव, खेड भागात मागील काही दिवसापासून मंदिरात चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. पंकज देशमुख सो यांनी पुणे ग्रामीण पोलीसदलास मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याचे व प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते.
पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. ११४/२०२४ भा.न्या.सं. २०२३ कलम ३३१ (४), ३०५ (a) सदर गुन्हयाचा तपास चालू असताना पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे तपास पथक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पो.हवा. अमोल वडेकर, पो.कॉ. संजय साळवे व पो. कॉ. मंगेश अभंग हे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना गेले काही महिन्यापासून वेगवेगळया पोलीस ठाणे हद्दीत जावुन मंदीर चोरीच्या गुन्हयांचे अनुषंगाने सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करीत असताना एक संशईत इसम चोरी करत असल्याचे आढळुन आले.
सदर इसमाबाबत तांत्रिक दृष्टया तपास करून गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सी.सी.टी.व्ही. मधील इसम हा विनायक दामू जिते हा आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची खात्री पारगाव (कारखाना) पोलीसांना झाली. सदर इसम हा शिकापुर येथे येणार असल्याची गोपनीय माहीती मिळाली असता त्यास सापळा रचून शिताफिने पो. कॉ. संजय साळवे व पो. कॉ. मंगेश अभंग यांनी शिक्रापूर येथून ताब्यात घेवुन त्यास मंदिर चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने सूरवातिस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने मंदिर चोरीची कबुली दिली त्यामुळे आरोपी नामे विनायक दामू जिते रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे यांस वरील गुन्हयाचे अनुषंगाने दि. ३१/०७/२०२४ रोजी अटक केली. तो पोलीस कस्टडीमध्ये असताना मंदिर चोरी बाबत त्याचेकडे अधिक विचारपुर केली असता त्याने
शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदीर, मांदळेवाडी येथील हनुमान मंदीर, जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदीर, असे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचे सांगीतले. त्यास आणखी विचारपुस करून तपास केला असता त्याने शिकापुर येथील राऊतवाडी येथील श्रीनाथ मस्कोबा मंदीर, शिक्रापूर येथील कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड राजगुरूनगर येथील कन्हेरसर येमाई जुने ठाणे मंदिर, शिरूर सविंदणे येथील काळूबाई मंदीर, रांजणगाव फंडवस्ती येथील तुकाई माता देवीचे मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदीर व कळमजाई मंदीर, तसेच अहमदनगर जिल्हयातील सुपा येथील तुकाई मंदीर वाडेगव्हाण पारनेर व नगर एम. आय. डी. सी. येथील श्री खंडोबा मंदिर शिव मल्हारगड
पिंपळगाव माळी इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी मंदिर चोऱ्या केल्या असल्याचे सांगीतले आहे.
सदर गुन्हयांच्या अनुषंगाने तपास करून चोरिस गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे. तो खालील प्रमाणे आहे.
१) पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. ११४ / २०२४ भा. न्या.सं. २०२३ कलम ३३१ (४), ३०५(a) हस्तगत माल ३२,००० /- रू भावीकांनी दानपेटीमध्ये दान केलेली रोख रक्कम व चलणी नाणी
२) पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. १२१ / २०२४ भा.द.वि. कलम ४५७, ३८०
१) ४ सोन्याचे मणी व २ सोन्याच्या वाटया वजन ३ ग्रॅम अंदाजे २) एक सोन्याची हस्तगत माल नथ वजन अर्धा ग्रॅम
३) घोडेगाव पोलीस ठाणे गु.र.नं. १४१ / २०२४ भा.द.वि. कलम ४५७, ३८० हस्तगत माल २ समई, अहुजा कंपनीचा अॅम्प्ली फायर.
४) खेड पोलीस ठाणे गु.र.नं. ४५२ / २०२४ भा. न्या.सं. २०२३ कलम ३३१ (४), ३०५ (३) हस्तगत माल देवीचा मुखवटा
५) शिरूर पोलीस ठाणे गु.र.नं. ६५२ / २०२४ भा.न्या.सं. ३३१ (४), ३०५ (३) हस्तगत माल अहुजा कंपनीचे अॅम्प्ली फायर, सोन्याच्या दोन वाटया, चार मणी वजन ३ ग्रॅम अंदाजे.
६) शिक्रापूर पोलीस ठाणे गु.र.नं. ६८६ / २०२४ भा.न्या.सं. ३३१ (४), ३०५ (a)हस्तगत माल अर्धा किलो वजनाचा चांदीचा देवीचा मुखवटा, अहुजा कंपनीचा अॅम्प्ली फायर, २ समई, २ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसुत्र
७) रांजणगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ३१२ / २०२४ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० हस्तगत माल १) २ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या वाटया २) २ ग्रॅम वजनाचे २ डुल ३) दिड ग्रॅम वजनाची सोन्याची नथ
८) सुपा पोलीस ठाणे गु.र.नं. २०५ / २०२४ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० हस्तगत माल १) एक सोन्याची नथ दिड ग्रॅम वजनाची २) दोन सोन्याच्या वाटया २ ग्रॅम वजनाच्या, चार सोन्याचे मणी १ ग्रॅम वजनाचे.
९) नगर एम. आय. डी. सी. पिंपळगाव माळवी गु.र.नं. २६७ / २०२४ भा.द.वि. कलम ४५७, ३८०हस्तगत माल एक ७ किलो वजनाचा पितळी घंटा अहुजा कंपनीचा अॅम्प्लीफायर
१०) शिकापुर पोलीस ठाणे गु.र.नं. ६०४ / २०२४ भा.द.वि. कलम ४५७, ३८० हस्तगत माल ०२ समई, चांदीचे दोन घोडे, व एक चांदीचा नंदी.
११) पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. १२२ / २०२४ भा.न्या.सं. २०२३ कलम ३३१ (४), ३०५ (a) हस्तगत माल २ सोन्याच्या वाटया, ४ सोन्याचे मणी, २ सोन्याच्या रिंगा ४ पितळी समई, आहुजा कंपनीचा अॅम्पली फायर असे एकुण १,६३,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिने, १,१७,०००/- रु किंमतीचे चांदी मुखवटे व पितळी धातूच्या वस्तु, ८०,००० /- रु व किंमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य व ३२०००/- रु कॅश.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख सोो, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे सो, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग श्री. अमोल मांडवे सो, पो. नि. अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. नेताजी गंधारे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे, श्री. भाऊसाहेब लोकरे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार अमोल वडेकर, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, पो.ना.शांताराम सांगडे, रमेश इचके, पो.कॉ. संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, सर्व पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे व पो.हवा. विक्रम तापकीर, पो.कॉ. निलेश सुपेकर, मंगेश थिगळे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे यांनी केली आहे.