खासदार इम्रान प्रतापगडी यांचा वाढदिवस काळेवाडीच्या मदरशातील मुलांसोबत साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ ऑगस्ट २०२४ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक शाखेच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक विंगचे गतिशिल अध्यक्ष आणि हुशार खासदार माननीय इम्रान प्रतापगडी यांचा वाढदिवस काळेवाडी येथिल मदरशातील मुलांसोबत साजरा करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अल्पसंख्याकांचे युवा नेतृत्व शहाबुदीन शेख यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमात अल्पसंख्याकांचे प्रमुख नेते व सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सध्याच्या भारत सरकारने, विशेषत: उत्तर प्रदेश, आसाम, भारताच्या ईशान्य प्रदेशातील अल्पसंख्याकांच्या म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन, जैन, फारसी, शिख आणि दलितांवर होणारे अन्याय व अत्याचार या सद्यस्थितीचे वर्णन केले, शहाबुदीन शेख आणि सर्व नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या वेळी काळेवाडी मदरसाचे मौलाना इमाम आफीफ आलम, काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वहाब शेख, सामाजिक कार्यकर्ता युनूस शेख, थेरगाव विभागाचे काँग्रेसचे युवा नेतृत्व इरफान शेख, आणि पार्टीचे सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.