अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त रेकॉर्ड ब्रेक ७२३ रक्तदात्यांचे रक्तदान
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ ऑगस्ट २०२४ चऱ्होली येथील माजी नगरसेविका विनया प्रदीप तापकीर यांच्या पुढाकारातून स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक ७२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दरम्यान रविवारी दिवसभर पाऊस असतानाही मूसळधार पावसात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. चऱ्होली, चोविसावाडी येथील गुरुकृपा मंगल कार्यालय येथे ( दि.4) या विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, प्रशांत कापसे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर, अनुज तापकीर तसेच चऱ्होली येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी विनया तापकीर म्हणाल्या, कोणत्याही आनंदी क्षणाला विधायक उपक्रमाची जोड देण्यात यावी असा उद्देश ठेवून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. येथील नागरिक या शिबिरात आवर्जून सहभाग नोंदवतात. अजूनही आपल्याला कृत्रिम रक्त तयार करता आलेले नाही. त्यामुळेच मानवी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. शिवाय रक्तदानामध्ये गेलेल्या रक्ताची शरीरात पुन्हा काही तासातच निर्मिती होऊन आवश्यक ती पातळी राखली जाते. रक्तदानामुळे रक्तदात्याला कोणताही धोका नाही. अशी जनजागृती ही या शिबिराच्या निमित्ताने दरवर्षी होते असेही तापकीर म्हणाल्या.
स्प्रिंग व्हॅली सोसायटीत अजित गव्हाणे यांच्या हस्ते सोलर सिस्टीमचे उद्घाटन :
वडमुख वाडी येथील स्प्रिंग व्हॅली या सोसायटीने इमारतीवर सोलर सिस्टीम बसवली आहे, त्याचे उद्घाटन अजित गव्हाणे यांनी केले. यावेळी येथील सदस्यांनी अजित गव्हाणे यांच्या बरोबर राहून त्यांना साथ देण्याची ग्वाही दिली आणि अजित गव्हाणे यांनी सुद्धा येथील नागरिकांना मदत करण्याची ग्वाही दिली. मोठ्या संख्येने यावेळी नागरिक हजर होते.
नागरिकांच्या शुभेच्छांनी गव्हाणे भारवले
सकाळ पासून पाऊस असताना सुद्धा नागरिकांचा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. यावेळी रक्तदात्यांबरोबर अजित गव्हाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांच्या या आपुलकीने अजित गव्हाणे अक्षरश: भारावून गेले. दरम्यान त्यांना या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी भावी आमदार असा उल्लेख करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.