आगामी सण, उत्सव शांततेत साजरे करावे!

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मूलूंड मुंबई दि. २७ मार्च २०२५ सण, उत्सवाच्या अंनुषगांने दिनांक २५ मार्च २०२५ रोजी पेण पोलीस ठाणे येथे शांतता कमीटी सदस्य यांची बैठक संपन्न
पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या अध्यक्षतेखाली पेण पोलीस ठाणे येथे आगामी सण उत्सवाच्या अंनुषगांने दिनांक २५.रोजी,शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली, यामध्ये गुढीपाडवा, रमजान ईद, यां सारख्या महत्वाच्या सण उत्सवाच्या विषयांवर चर्चा झाली, कायदा व सुव्यवस्था राखून सर्वांनी आनंदाने सण साजरे करावेत, तसेच सर्व,धर्म बांधव यांनी एकरूप होऊन सण साजरे करावेत असे आवाहन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केली यावेळी शांतता कमिटी वर असणारे सदस्य तथा जनचक्र वार्ताचे संपादक दिनेश म्हात्रे शांतता कमिटी सदस्य -सुनील पाटील, अविनाश म्हात्रे, एल के म्हात्रे, देवा पेरवी, संतोष पाटील, भाई पोटे, कन्हय्या पुनमिया, अनिल दरेकर, पायल सुर्वे, गिरीश शहा, मोईज बोहरी, शिगवण, भरत साळवी, दिपक संसारे, अनंत पडवळ, गोपनीय किशोर घरत, निलेश ठाकुर आदी व शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. सर्व सण, उत्सव शांततेत व कुठेही गालबोट न लागता उत्सवात साजरे करण्याचे आव्हान पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



