भिडे वाड्याचा पुनर्विकास करून राष्ट्रीय स्मारक घोषीत करवे… प्रा.बी.बी. शिंदे

प्रतिनिधी-क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा
जोतीराव फुले यांनी भारतातील स्त्री शिक्षणासाठी ०१ जानेवारी १८४८ साली भिडेवाडा पुणे येथे जी मुलींची पहिली शाळा चालू केली होती. त्या भिडे वाड्याचा पुनर्विकास करून राष्ट्रीय स्मारक -घोषीत करवा या करीता सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना महा. राज्य.ने मूख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेना व प्रधान सचिव समाजकल्याण विभाग डाॅ. सूमंत भांगे साहेब यांना पत्र दिले या वेळी प्रा.बी.बी. शिंदे बोलत होते की.. सर्व जगाच्या जिवनात 1848 हे वर्षे एक महान क्रांतीकारी वर्षे ठरले आहे. कार्ल मार्क्स यांनी त्याच वर्षी “कम्युनिष्ठांचा जाहीरनामा” हा आपला ऐतिहासीक प्रबंध प्रसिद्ध केला होता. अमेरिकेत स्त्रियांच्या उध्दाराची चळवळ त्याच वर्षी न्यूयार्क येथील वल्सियन चर्च येथे सूरू झाली. तिकडे अमेरिकन स्त्री क्रांतीच्या मार्गावर असताना इकडे भारतीय स्त्री गूलामगीरीच्या बंधनात खितपत पडली होती. मनूस्मृतीच्या आज्ञे प्रमाणे हिंदू स्त्रीला कनिष्ठ दर्जा देण्यात आला होता.
श्रुतीचा काळ सोडला तर शतकानुशतके तीच परिस्थिती चालू होती. पाश्चात शिक्षणच्या जाणीवेचा विचार प्रणालीचा महाराष्ट्रीयावर दूरगामी परिणाम होवू लागला होता. उंच वृक्षांना वाऱ्याची दिशा चटदिशी समजते, त्याप्रमाणे खर्या थोर पुरुषांना नव विचारांची, दिशा चटदिशी समजते अन त्याकडे ते झूकतात. या देशातील स्त्रियांना व शूद्रांना शिक्षणा पासून दूर ठेवले होते. अज्ञान म्हणजे आंधार व शिक्षण म्हणजे प्रखर सूर्य प्रकाश हा प्रकाश अज्ञान अंधकार-नष्ठ करून, मनुष्यांचे जिवन चैतन्यमय करून सोडतो. जीवीत पूर्णपणे विकसित करण्याचे आणि जगण्याच, शिक्षण हे एक प्रमुख साधन आहे.
म्हणून जोतीबांनी पहिली शाळा मुलींसाठी “बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात १८४८ ला सूरू केली होती”. त्या शाळेला आता जवळपास 175 वर्षे होत आहेत. ती अति जिर्न झाली असुन मोडकळीस आली आहे. त्याकडे पाहिले की मन दुःखाने हेलावून जाते.
या आमच्या वरिल विषयांकीत मागणी प्रमाणे अनेक जनांकडून अनेक अर्ज विनंत्या आलेल्या असतील आपल्या या महाराष्ट्र शासनातर्फे अनेक वेळा या वाड्याच्या दुरुस्ती संदर्भात व राष्ट्रीय स्मारक घोषित करण्या संदर्भात आश्वासीत केलेले असेल, निधीही मंजूर केला गेला असेल. मग आमचा आपणास प्रश्न आहे की? या भारत देशात संविधानाचा अमल सुरु होवून 73 वर्षे झालीत. या काळात राज्यात तसेच केंद्रात अनेक पक्षांची व अनेक विचारांची सरकारे आली आणि गेली तरी हा भिडे वाडा दुर्लक्षीत कसा ?
हे काम ज्या जातीच्या नेत्यांनी सुरु केले. त्याच जातीच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी करावे, अशी धारणा काहींच्या मनात उत्पन्न होते. परंतु डॉ. बाबासाहब भिमराव आंबेडकर यांनी या देशाचे संविधान प्रत्येक नागरीकांसाठी लिहुन देशाला अर्पण केले. तसे महात्मा जोतीबा फुले यांनी सर्व स्त्री वर्गाचा उद्धार व्हावा यासाठी हे कार्य सुरु केले होते.
त्याचा परिणाम म्हणून आज आपण आपल्या स्त्रीयाचा जोमदार उत्कर्ष झालेला पहात आहोत. म्हणुन या अस्मितेच्या भिडे-वाडयाचा त्वरीत विकास करून, ते राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्यात यावे. तसेच मा. साहेबांना विनंती. करण्यात येते की या विषयांकीत प्रश्नाबाबत आपण आमच्यावर धरणे, आंदोलन,
उपोषण, मोर्चे काढून, महाराष्ट्र भर या साठी रान उठवण्याची पाळी येवू देऊ नये. हि नम्र विनंती राहिल. असे श्री. बी. बी. शिंदे यांनी या पत्रा द्वारे मूख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेयांना कळवले यावेळी मा. लक्ष्मण सिरसट सचिव सर्वहारा समाज, मा. रामभाऊ ओव्हाळ सहसंघटक सर्वहारा समाज, सौ. सावित्री शिंदे, महिला अध्यक्षा सर्वहारा समाज, मा. हरिश्चंद्र (आप्पा) शिंदे सचिव सर्व द्वारा समाज, मा. शिवराज वाघमारे, कार्याध्यक्ष- सर्वहारा समाज, मा. शिवाजीराव झोडगे.(अध्यक्ष) दी बूद्धिष्ट विकास फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, मा. दत्ताभाऊ गायकवाड उपाध्यक्ष – सर्वहारा समाज
मा. अविनाश भालेराव अध्यक्ष बौद्ध विहार
बालाजीनगर, मा. राजेंद्र पवार बहुजन समाज पार्टी शहर महासचिव पिंपरी चिंचवड शहर, प्रदीप टोपे सामाजिक कार्यकर्ता (पत्रकार), मा. ज्ञानेश्वर (माऊली) बोराटे अध्यक्ष राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी पिं.चि. शहर, मा. आशोक जावळे अध्यक्ष सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज, मा. नारायण मस्के (नाना) महासचिव सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज महाराष्ट्र राज्य, ॲड. वैजनाथ रामराव सूर्यवंशी उदगीर, जि. लातूर नेते रिपब्लिकन सेना, मा. धुराजी शिंदे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन सेना, दिलिप बनसोडे सदस्य सर्वहारा उत्कर्ष चिंतज समाज, तूकाराम गव्हाणे सदस्य सर्वहारा उत्कर्ष चिंतज समाज, सागर वोरसे यूवाध्यक्ष सर्वहारा उत्कर्ष चिंतज समाज हे शिष्टमंडळ उपस्थित होते.




