मा. राजन नायर यांंनी काँग्रेस पक्षाकडून चिंचवड विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी फॉर्म भरला..
विशेष प्रतिनिधी पिंपरि चिंचवड दि. १२ ऑगस्ट २०२४ पुणे जनमानसात आपल्या कार्याद्वारे विशेष ठसा उमटविणारे लोकप्रिय सामाजिक नेते मा. राजन नायर यांनी काँग्रेस पक्षाकडून चिंचवड, पुणे विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी फॉर्म भरला असल्याचे समजते. गेली ३७ वर्षे काँग्रेस पक्षात विविध पदांवर असताना त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये ख्रिश्चन समाजाकडुन तसेच इतर सर्व समाज आणि धर्माच्या लोकांकडूनही खूप प्रेम, सन्मान मिळाला. मागील दहा वर्षात ख्रिस्ती समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार झाले, पास्टरांवर बिनबुडाचे विनाकारण आरोप करून अटक करण्यात आले. अशा कठीण काळात मा. राजन नायर यांनी निर्भिडपणे अनेक ठिकाणी मोर्चे व आंदोलनाचे नेतृत्व केले. समाजाकडून कशाचीही अपेक्षा न ठेवता समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करत आले. आणि पूढे ही ते करत राहणार आहेत असे नायर यांनी यावेळी सांगीतले.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतात आणि अनेक मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण M.A.M.B.A.(HR), B.Ed.DSM झाले असल्यामुळे विविध विषय, राजकीय पक्ष, समाज आणि कायद्याबाबत सखोल अभ्यास त्यांचा झालेला आहे. सुशिक्षित असण्याबरोबरच त्यांनी प्राध्यापक म्हणूनही उत्तम प्रकारे काम केले आहे. आपली मते लोकांसमोर अतिशय निर्भीडपणे आणि बिनधास्तपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. अल्पसंख्याक समाजासाठी भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याशी अनेकवेळा त्यांनी लढा दिला आहे. तरुणांना तसेच महिला, विधवा आणि वृद्धांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांवर पुरेसे उपाय त्यांनी केला आहे. बिकट परिस्थिती मध्ये असणाऱ्या अन्यायग्रस्त गरिबांच्या पाठीशी ते निडरपणे उभे राहिले आहेत. पास्टर, बिशप, ख्रिश्चन नेते, विद्यार्थी, कामगारवर्ग सर्वांशी उत्तम संवाद साधण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये दिसून येते.
केवळ ख्रिस्ती समाजालाच नव्हे तर अल्पसंख्याक समाजाला ही अशा निडर नेतृत्वाची नितांत गरज आहे. सर्व पंथीय ख्रिस्ती समाज, मागासलेली माणसे, तरुण पिढी, समाजावर नवीनच लादले जाणारे नियम-कायदे आणि निर्बंध या सगळ्या विरोधात उठणारा एकमेव बुलंद आवाज म्हणजे राजन नायर. आपल्या बुद्धिमत्तेने भाजपा, आरएसएस आणि बजरंग दलाच्या विरोधात खळबळ उडवून देणारे राजन नायरच आहेत.
नायर हे नेहमीच सर्व समाजांच्या आवाजासाठी उभे असतात, त्यामुळे ख्रिस्ती, मुस्लिम, वंचित बहुजन समाजातील मोठा समुदाय अशा व्यक्तीच्या मागे उभा राहिला आसल्याचे दिसते. सर्वांनी त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ द्यावी अशी माफक अपेक्षा त्यांनी यावेळी केली.
अल्पसंख्याक समाजाचा आवाज, त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत, कायद्याच्या चौकटीत शासनासमोर उभे राहण्यासाठी आणि शासनाकडे समाजाचे हक्क मागण्यासाठी, असा बुलंद आवाज निवडून दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी बोलून दाखवली. त्यांना पाठिंबा देण्यास, त्यांच्या मागे उभे राहण्यास ख्रिस्ती समाज एकवटला असल्याचे दिसून येते.
सर्व पंथीय विखुरलेल्या समाज बांधवांनी तसेच अल्पसंख्याक समाजाने देखील एकत्र येऊन पाठीशी उभे राहून भरघोस प्रतिसाद द्यावा अशी विनंती राजन नायर यांनी केली.