प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ ऑगस्ट २०२४ उद्या १५ ऑगस्ट निमित्ताने “हात से जुडे हात तिरंगा के साथ” अशा शीर्षकांतर्गत सकाळी आठ वाजल्या पासून संध्याकाळी सहा पर्यंत तिरंगा झेंडा हाती फडकवण्याचा
निर्धार करायचा मानस डॉक्टर सेल पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसने केला आहे. अशी माहिती शहर डॉक्टर सेलच्या अध्यक्ष डॉ. मनिषा गरुड यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड म. न. पा. आयुक्त, पोलीस आयुक्त, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक संघटना, राजकीय संघटना पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन आय. एम.ए
निमा व विमा होमिओपॅथी फिजोथेरपी असोसिएशन,
सगळ्या धार्मिक जातीचे घटकाचे लोक कामगार, उद्योजक, बांधकाम व्यवसायिक, लायन्स क्लब, रोटरी क्लब, नागरिक बचत गट, सार्वजनिक माध्यमे, पत्रकार, सगळ्यांचा यात सहभाग करून घ्यायचा आहे
सदर कार्यक्रम सूरू असताना दिवसभर म्हणजे १२ तास स्पिकरावर देशभक्ती पर गीत वाजत राहणार आहेत, तसेच या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सदर व्यक्तीस त्यांचा सहभाग असलेला फोटो भेट देण्यात येईल.
या उपक्रमामध्ये डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ. मनोज राका, डॉ संदीप भिरुड, डॉ. सुमंत गरूड, डॉ. सुजित पोखरकर, डॉ. सायली बाबुंर्डे, डॉ. सुहास कांबळे तसेच पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम महिला अध्यक्षा सौ. सायली नढे, युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, NSUI चे उमेश खंदारे, सेवा दलचे राष्ट्रीय जॉइंट सेक्रेटरी संग्राम तावडे, पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रा. (ॲड) किरणजी खाजेकर सर व सर्व पक्षीय लोक उपस्थित राहणार आहेत.
तरी या विक्रमी कार्यक्रमात समस्त नागरिक, कामगार, उद्योजक, विद्यार्थी, व्यावसायिक, डॉक्टर्स याना सहभागी होण्यासाठी शहर डॉक्टर सेलच्या अध्यक्ष डॉ. मनिषा गरुड यांच्या वतिने आवाहन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमा मध्ये सहभाग नोंदणी करण्याकरिता खालील मोबाईल क्रंमाकावर संपर्क करा. 9822059945