क्रांतिवीर विचार मंचच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड मधील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा.
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ ऑगस्ट २०२४ काल १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८-३० वाजता क्रांतिवीर विचार मंच ( महाराष्ट्र राज्य ) स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर लहुजी शिष्य वासुदेव बळवंत फडके यांच्या चिंचवड स्टेशन येथील स्मारकास क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश शिंदे व राजू आवळे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुलतान या “ जर्मन स्टार ॲाफ इंडिया “ नामाकंन प्राप्त लघुपटाचे- दिग्दर्शक अविनाशजी कांबीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी मा. श्री. आसारामजी कसबे यांनी लहुजी गर्जना व लहू वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम नाथा शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जेष्ठ नेते संदीपान झोंबडे, अविनाश शिंदे, नाथा शिंदे, राजु आवळे, (काँग्रेस समाजिक न्याय विभाग) चंद्रकांत लोंढे, शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड अध्यक्ष मयूर जाधव, आण्णासाहेब कसबे, धिरज सकट, डी. पी. खंडाळे, रामदास कांबळे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले, पै. विठ्ठलराव शिंदे, नबीलाल शेख, आयुब शेख, अनिल लगाडे, विजय देवरे, जॉय गायकवाड, श्रेयश लाटकर, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.