अभिवादनदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“हात से जुडे हात तिरंगा के साथ” डॉक्टर सेल पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यदिनी बारा तास तिरंगा फडकवण्याचा शहरात विक्रम..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ ऑगस्ट २०२४ हात से जुडे हात तिरंगा के साथ डॉक्टर सेल पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यदिनी बारा तास तिरंगा फडकवण्याचा शहरात विक्रम. डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. मनीषा गरुड यांच्या संकल्पनेतून साकार झालेला. हा आगळावेगळा कार्यक्रम सूर्योदयावेळी बरोबर सहा वाजता बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, शाळेतील विद्यार्थी, ट्राफिक पोलीस, माजी सैनिक, राष्ट्रीय सेवादल यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या गीताने सुरू झाला. दिवसभरात आपल्या देशाचा अभिमान देशाची शान असलेला हा तिरंगा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत खाली ठेवायचा नाही ही कल्पनाच इतके भारावून देणारी होती शहरातील जवळजवळ दोन हजार नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. रस्त्यावरून जाणारे प्रत्येक नागरिक उत्स्फूर्त भाग घेत होते दिव्यांग व्यक्ती, अंध व्यक्ती, शहरातील युवा, विद्यार्थी, कामगार वर्ग, रोजंदारीवर काम करणारे, तृतीयपंथीय, साधू, वैदु पासून रस्त्यावरचे भिकारी देखील अभिमानाने झेंडा हातात घेत होते
या कार्यक्रमातून शहरभरातील सगळे राजकीय धार्मिक संघटनेने आपला सहभाग नोंदवला.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज राका, सुमंत गरुड, अंबालाल पाटील, संदीप भिरुड, सायली भांबुर्डे, सुजित लोंढे, सुजित पोखरकर, ज्योती भारुड, मोना दिवाण, प्रिया दिवाण, डॉ. तानाजी बांगर, डॉक्टर सुहास कांबळे,
नाणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्लेकर, मयूर जयस्वाल, बाबा बनसोडे, जितेंद्र छाबडा, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, ज्येष्ठ नेते अभिमन्यू दही तुले, निघारताई बारस्कर, बाबा मुकुटमल, माडगूळकर काका, फ्रंटलचे उमेश खंदारे, किरण खाजेकर, सेल आणि विभागाचे श्री. विशाल सरवदे, विजय ओवाळ, रविभाऊ नांगरे, सुप्रिया पोहारे, निर्मलाताई खैरे, स्मिताताई पवार, सिंग, जुबेर भाई, मेहबूब भाई, शाबुद्दीन भाई, इरफान भाई, राजन नायर, शिबू असेफ, झेवियर अँथोनी, भीमशक्तीचे सुरज गायकवाड, बी. बी. शिंदे, संदेश नवले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार श्री. गौतम चाबुकस्वार, समाजसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष देवेंद्रजी तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्षा सौ. ज्योतीताई निंबाळकर, युवा अध्यक्ष इमरान शेख, बी. बी. पाटील अशा सगळ्या स्तरातील लोकांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाची सांगता काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते श्री. गोपाल दादा तिवारी यांच्या उपस्थितीत ध्वजगीत आणि राष्ट्रीय गीत म्हणून बरोबर सहा वाजता करण्यात आली.
शहरभरात या अनोख्या कार्यक्रमाची खूप चर्चा आणि कौतुक झाले राष्ट्रभक्ती आणि तिरंगा हे मार्केटिंगचा विषय नसून आचरणात आणण्याचा मानस असावा स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्मानी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा दिवस असतो असे श्री. कृपा तिवारी यांनी सांगितले. दिवसभर स्पिकरवर वाजत असलेल्या विविध देशभक्तीपर गीतांनी वातावरणात एक नवचैतन्य निर्माण झाले होते.
यावेळी मनीषा गरुड म्हणाल्या की मागे एका कार्यक्रमात त्या झेंडा हातात घेऊन सलग दोन तास उभ्या होत्या. प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः डॉ. मनीषांना फोन करून त्यांचे खूप कौतुक आणि अभिनंदन केले. त्यावेळी जर आपण दोन तास उभे राहू शकतो तर संपूर्ण शहर एकत्र येवून बारा तास का नाही आपला तिरंगा हातात घेऊ शकणार या विचारातून ही संकल्पना तयार झाली आणि सगळ्या नागरिकांच्या सहभागाने ही संकल्पना यशस्वी देखिल झाली. यावेळी डाॅ. मनीषा गरुड यांनी उपस्थितांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!