आरोग्य विभागातील मुकादम श्री. मुकुंद कदम यांच्या सेवा निवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम संपंन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० सप्टेंबर २०२३
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील मुकादम श्री. मुकुंद ज्ञानोबा कदम यांच्या सेवा निवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम व सर्व कर्मचाऱ्यांना स्नेहभोजन कार्यक्रम काल संपंन्न झाला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य विभागात मुकादम या पदावर असलेले श्री. मुकुंद ज्ञानोबा कदम हे आज वयाच्या ६० व्या वर्षी सेवा निवृत्त झाले.
कदम भाऊसाहेबांनी महापालिकेमध्ये त्यांच्या आयुष्यातील ३९ वर्ष महापालिकेची सेवा केलेली आहे.
त्यांनी १९८४ साली महापालिकेच्या उद्यान विभागातून रोजंदारी तत्त्वावर सेवेची सुरुवात केली.
१६ जानेवारी १९८६ ला कायम स्वरूपी तत्वावर रूजू झाले. सात वर्ष उद्यान विभागात सेवा केली.
१९९१ ते २०१४ अशी २३ वर्षे अतिक्रमण विभागात सेवा केली २०१४ ते २०१५ हे एक वर्ष पाणीपुरवठा विभागात सेवा केली नंतर २०१५ ते सप्टेंबर २०२३ अशी आठ वर्ष त्यांनी आरोग्य विभागात मुकादम या पदावर सेवा केली. आणि काल ते सेवा निवृत्त झाले.
त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला महापालिकेतील कर्मचारी अधिकारी सुधीर वायदंडे, अविष्कार डोळस, चंद्रकांत लवळे, सुरज चंडालिया, कैलास दुराफे, एजी ग्रुपचे दाऊलभाई दीपक आढाव, अभिमान रणसुरे. कार्तिक आयरे, नवनीत कुमार, नरसिंग जाधव, मौला शेख, सत्वशीला पोतेकर, पवन मिसाळ, अजय खोकर, अमोल साबळे, तसेच अनेक महिला व पूरूष कर्मचारी उपस्थित होते सर्व कर्मचाऱ्यांनी दुःखद अंतकरणाने कदम भाऊ साहेबांना निरोप दिला व पुढील काळात चांगले समाज कार्य व्हावे आशा शुभेच्छा दिल्या..
मराठवाडा फुले शाहू आंबेडकर कला प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, तथा भिमशाहिर कवी गायक व एजी ग्रुपचे सफाई मित्र माननीय अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी कदम भाऊसाहेबांच्या सेवेबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी केले.
कदम भाऊसाहेबांनी सेवा निवृत्ती निमित्त सर्व कर्मचाऱ्यांना भोजनदान दिले. दीपक आढाव यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.




