प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ ऑगस्ट २०२४ बदलापूर मध्ये लहान मुलीवर झालेला अत्याचार पाहता पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा सुरक्षित करा. अशी मागणी मनसे महिला सेने कडुन निवेदना द्वारे करण्यात आली. निवेदनात पूढे असे लिहिले आहे की मा. आयुक्त साहेब आत्ताच बदलापूर शहरात घडलेली दुर्देवी घटना आपल्या सर्वानाच माहीती आहे. आणि यापूर्वी ही अशा
अनेक विकृतीच्या धक्कादायक घटना आपला ही शहरात घडलेल्या समोर आल्या आहेत. अशा घटना वारंवार घडत आहे ही खूपच चिंतेची बाब आहे.
अशा या घटनांनमुळे आज लहान मुली ही सुरक्षित नाहीत. याआधी ही महीला, मुली, वरिष्ठ महिला यांच्यावर ही वारंवार लैंगिक आत्याचार झालेले आहेत. पण त्यामध्ये चिंतेची बाब म्हणजे बदलापूर मध्ये शाळेमध्ये झालेली
घटना ही अतिशय गंभीर आहे. यासाठी आपल्या ही शहरात अशा घटना घडू नये म्हणून प्रत्येक शाळांना आपण आयुक्त म्हणून असे आदेश दयावेत की.
१) प्रत्येक शाळेच्या बाथरूम जवळ महील सुरक्षा रक्षक नेमावेत.
२) त्या आवारामध्ये C.C.T.V कॅमेरे बसवावेत.
३) प्रत्येक शिक्षक शिपाई कर्मचारी यांचे पोलिस Verification (पडताळणी) व्हावी.
४) प्रत्येक शाळेमध्ये मुलींना लैंगिक आत्याचार होवू नये यासाठी मुलींना स्वःताचे संरक्षण करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दयावे. असे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी संगीताताई देशमुख, वैशालीताई कोराटे, वैशालीताई बोत्रे, सुनिता ताई तोडकर, अनिताताई पाटील, दिपालीताई पाटील तसेच सर्व महिला सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.