आंदोलनगून्हामहाराष्ट्रराजकीयविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

बदलापूर येथील लहान बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ भिमशक्ती संघटना व काँग्रेस परिवहन विभाग पिंपरी चिंचवड शहर यांचे वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निषेध आंदोलन करण्यात आले..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ ऑगस्ट २०२४ या घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. अशा घटनांना आळा घालण्यास गृहमंत्री कमी पडताहेत म्हणून त्यांच्याही राजिनाम्याची मागनी यावेळी करण्यात आली. हे आंदोलन भिमशक्ती पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष सुरज गायकवाड यांचे नेतृत्वाखाली घेण्यात आले. आंदोलनाचे नियोजन हरीश डोळस (सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर) मिलिंद फडतरे (सचिव पिंपरी चिंचवड शहर ) प्रतिभा बनसोडे (युवा भीमशक्ती उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ) प्रतिभा कांबळे (अध्यक्ष औद्योगिक सेल काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर) यांनी केले.
यावेळी माजी नगरसेविका निगाताई बारस्कर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, भरत वाल्हेकर (वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर ) नरेंद्र बनसोडे (वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर ) विजय हिंगे (पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष भिम शक्ती संघटना ) डॉ. मनीषा गरुड (डॉक्टर सेल पिंपरी चिंचवड शहर) विजय ओव्हाळ (अध्यक्ष मागासवर्गीय विभाग पिंपरी चिंचवड शहर ) विशाल सरवदे (अध्यक्ष रोजगार व स्वंयरोजगार सेल काँग्रेस ) जेवियर ॲन्थोनी अध्यक्ष ग्राहक सेल पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस ) गौरी शेलार (नेत्या काँग्रेस भोसरी विधानसभा) तारीक भाई, रमेश आप्पा कांबळे, शिवशंकर उबाळे, (भिमशाही संघटना अध्यक्ष )नरेंद्र सोनटक्के (उपाध्यक्ष युवक भिम शक्ती पिंपरी चिंचवड ) फिरोज तांबोळी (उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड काँग्रेस परिवहन विभाग ) जितेन्द्र छाबडा ( उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस) ॲड.अनिकेत रसाळ (उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस) , कपिल डोळस अजय शेरखाने प्रमोद शेलार अशोक गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!