प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ सप्टेंबर २०२४ वर्षावास २०२४ निमित्त २५ ऑगस्ट रोजी प्रबुद्ध मैत्री संघ आदर्श नगर मोशी व भंते धम्मानंद यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग धम्म सहल आयोजित केली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय विश्रामगृह स्मारक नारायणगाव व भूत, आंबा अंबिका बौद्ध लेणी व सातवाहन काळातील नाणेघाट जुन्नर पुणे महाराष्ट्र येथे प्रबुद्ध मैत्री संघ तसेच धम्म दूत मैत्री संघ भोसरी दिघी रोड यांचे उपासक उपासिका तरुण मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते भंते धम्मानंद यांच्या हस्ते बौद्ध लेणीवर बोधिवृक्ष लावण्यात आला तसेच लेणीवर बोधिवंदना धम्मदेसना त्रिशरण पंचशील व लेणी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. बौद्ध लेणी बद्दल जागृती वाढावी भगवान गौतम बुद्धाचा व सम्राट अशोकाचा वारसा माहित व्हावा यासाठी प्रबुद्ध मैत्री संघ वेगवेगळ्या बौद्ध लेणीवर धम्म सहल आयोजित करत असतो लेणी संवर्धक गणेश वावळ यांनी स्मारका विषयी श्रामनेर शिबिर व जुन्नर मधील बौद्ध लेण्या विषयी माहिती दिली या निसर्ग धम्म सहलीचे धम्मसेवक राजू कांबळे यांनी दोन महिने अगोदर तयारी करून नियोजन केले होते. सहलीमध्ये सुसूत्रता सर्वांचा समन्वय गरमागरम भोजन सुरक्षेविषयक विशेष काळजी घेतली गेली. प्रबुद्ध मैत्री संघामध्ये पावसातील कठीण परिस्थितीमध्ये ऊर्जा, उत्साह मैत्री, आदर भावना, एकजूट, जोश आनंद, परिश्रम दिसून आले या धम्म सहलीत वृक्ष मित्र ज्ञानेश्वर दांडगे, विनोद मोरे, अशोक तूपसौंदर, आदरणीय सुभाष वाकळे गुरुजी खजिनदार धम्म बंधू संतोष तायडे, अध्यक्ष नरेंद्र प्रगणे, सचिव साहेबराव गोपाळे इतर लुंबिनी बुद्ध विहार जुन्नर बौद्ध लेणी संवर्धक गणेश वावळ व प्रबुद्ध मैत्री संघाच्या सभासदांनी धम्म सहल यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. शेवटी जास्तीत जास्त संघ विहारांनी बौद्ध लेणीवर धम्म सहल आयोजित करावी असे आवाहन प्रबुद्ध मैत्री संघाच्या आदर्शनगर मोशी यांच्या वतीने सर्वांना करण्यात आले.