महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
शिवशाही व्यापारी संघ उत्तरभारतीय आघाडी पिं. चि. शहर अध्यक्षपदी प्रदिप कुमार पाल यांची नियुक्ती जाहीर.
प्रतिनिधी मुंबई दि. ०७ सप्टेंबर २०२४ शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश डाकोरे यांच्या सुचनेनुसार श्री. प्रदिप कुमार पाल यांची शिवशाही व्यापारी संघ उत्तर भारतीय आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी नियुक्ती संस्थापक/ अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातुन नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ उत्तर भारतीय आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रदिप कुमार पाल यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग,व माता भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.