पिंपरी चिंचवड वाहतुक पोलीस व मेडिकव्हर हॉस्पीटल भोसरी यांचे सहकार्याने पिंपरी चिंचवड शहरात राबवला जाणार वाहतुक सुरक्षा सप्ताह..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ सप्टेंबर २०२४ पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी यासाठी वाहतुक पोलीस व मेडिकव्हर हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यामाने या अभियानाची सुरवात करण्यात आली. या अभियानाचा उद्देश पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करणे आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणे आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. बापू बांगर, मा. पोलीस उपायुक्त वाहतुक शाखा पिंपरी चिंचवड
यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाहतुक नियोजन विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पिंजण व वाहतुक पोलीस अंमलदार तसेच मेडीकव्हर हॉस्पीटल भोसरीचे प्रमुख डॉ. व्यास मौर्या, मार्केटिंग प्रमुख अमोल मुळे, मॅनेजर सुमित चौधरी, अमोल कवडे असे सर्वजन उपस्थित होते.
या प्रसंगी मा. पोलीस उपायुक्त, वाहतुक शाखा पिंपरी चिंचवड यांनी रस्ता सुरक्षेचे महत्व आणि
नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले तसेच या मोहिमेव्दारे आम्ही अपघात आणि मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतुक अभियानाची मोलाची मदत होईल असे मत व्यक्त केले आहे.
आवाहन :- नागरीकांनी आपले ताब्यातील वाहन सुरक्षितपणे चालवून स्वतःचे तसेच इतरांचे जिवन सुरक्षित करणेचे आवाहन वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड तसेच मेडीकव्हर हॉस्पीटल भोसरी यांचे मार्फत सर्व नागरीकांना करण्यात आले.