महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महानगरपालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, दि. १५ नोव्हेंबर २०२३ लहानपणापासूनच देशभक्तीची आवड असलेले थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारून, हजारो क्रांतिकारकांची फौज केली आणि केवळ तीर कामठासारख्या शस्त्रांनी त्यांनी दिलेला अनोखा लढा स्वातंत्र्यलढ्याच्या पुस्तकात सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
अभिवादन प्रसंगी माजी नगरसदस्या उषा मुंढे, आशाताई सुपे, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुपे, पांडुरंग परचंडराव, ज्ञानेश्वर जाधव, अंजिक्य राऊत, डाॅ.संजय दाभाडे, डाॅ.सुनिल पवार, मारूती खामकर, राजीव केंगले, धर्मेंद्र भांगे, बाळासाहेब गायकवाड निवृत्ती लांडे, रमेश साबळे, सिताबाई किरवे उपस्थित होते.
बिरसा मुंडा हे स्वतः भारतीय संस्कृती तसेच औषधी विज्ञानात पारंगत होते. त्यांनी अनेक रुग्णांची सेवाही केली तसेच आपली घरे स्वच्छ ठेवा, सर्वांनी एकजूटीने राहा असा संदेशही त्यांनी समाजाला दिला असे सांगून अतिरीक्त आयुक्त जगताप यांनी भावी पिढीने क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रखर देशभक्तीचा आदर्श घ्यावा असे आवाहन ही केले.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!