अनधिकृतआर्थिकगून्हाघोटाळेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शेवगांव तालुक्यात वनविभागाच्या आशिर्वादाने बेसुमार वृक्षतोड ???

शहरातुन दिवसाढवळ्या वाहतुक प्रशासनाकडून कारवाईच्या नावाने बोंबाबोंब..


प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. २५ डिसेंबर २०२४ या बाबत सविस्तर वृत्त असे की झाडं जगली तर सावली मिळेल, फळं खायला मिळतील आणि मुख्य म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. पावसाचं प्रमाण चांगलं मनाजोगतं राहिल. महाराष्ट्राचे राज्य शासन वारंवार  ‘झाडं लावा, झाडे जगवा’ हा संदेश सर्वत्र पोहोचण्यासाठी वन विभागामार्फत लाखो रुपये खर्च करतं परंतू शेवगांव  तालुक्यात शासनाचा हा संदेश केव्हाच उडत गेला.
अक्षरशः वन अधिकार्यांच्या संगनमतानं किंबहूना वरदहस्तानं शेवगांव  तालुक्यात हजारो झाडांची बेसुमार कत्तल सुरु आहे. याकडे वनविभागाच्या वरिष्ठ  अधिकार्यांचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कारवाईच्या नावाने बोंबाबोंब आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसह धारण पट्यात  गावातल्या शिवारातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड अत्याधुनिक कटर मशीनचा वापर करून काही मिनिटात केली जात आहे. दररोज पाच ते सहा ट्रॅक्टर तसेच टेम्पोच्या सहाय्याने लाकडांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असतांना वनविभाग झोपेचे सोंग का घेते??? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. तसेच अवैध वृक्षतोड यामुळे तालुक्यातील वनसंपदा धोक्यात येते की काय ?
असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. परिसरात दिवसा ढवळ्या तसेच रात्री- अपरात्री छोट्या-मोठ्या झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड केली जाते. राजरोसपणे लाकडाने भरलेल्या गाड्या रस्त्यावरून भरधाव वेगाने धावताना दिसून येत असताना पोलिसांसह  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसत नाहीत का ??? असा सवाल शेतकरी, वृक्ष प्रेमी तसेच ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. खुले आम होत असलेली वृक्षतोड ही वनविभागाला माहित नाही, की माहित असून मुद्दाम कानाडोळा केला जातोय ??? असा प्रश्न वृक्षप्रेमींना पडला आहे. या प्रकरणामुळे  तालुक्यातील पूर्व भागातील वनसंपदा धोक्यात आली आहे. त्यामुळे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन होणारी अवैध वृक्ष तोड त्वरीत थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल. नवनिर्वाचित वनमंत्री गणेश नाईक यात लक्ष घालुन संबंधीतांवर कडक कायदेशीर कारवाई करतील ही सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना अपेक्षा आहे.
ताजा कलम
रात्रीची व भर दिवसाची लाकडांची वाहतूक ! नेवासा तालुक्याचे वृक्षतोडीचे चित्र पाहिले तर येथे सूर्योदया अगोदर वृक्षतोड सुरु होते. लाकडांची वाहतूक रात्रीच्या सहानंतर सुरु होते. सूर्यास्तानंतर कोणत्याही प्रकारची लाकडांची वाहतूक करायला कायद्याने बंदी आहे, तर रात्रीच्या वेळी झाडे तोडण्यासही कायद्याने बंदी आहे. मात्र नेवाशामध्ये झाडांची बेसुमार कत्तल करणारे हा कायदा सर्रासपणे पायदळी तुडवत आहेत.
अहिल्यानगर जिल्हा वन अधिकारी व  वनविभागाने शहरातील टाळे ठोकलेल्या सॉमिल रात्री नियमबाह्य राजरोस सुरु असतात त्या कोणाच्या आशिर्वादाने ???

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!