आंदोलनउत्सवमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

घोंगडी बैठका मार्फत मतदारांशी जोडली तुतारीची नाळ.. शरद पवारांनी दिलेल्या उमेदवाराच्या गळ्यात यंदा पडनार विजयाची माळ..

पिंपरी व भोसरी विधानसभेमध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी गावच्या पारावरी घोंगडी बैठकाने वातावरण फिरवले..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ आक्टोबर २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध मतदार संघात २९ ऑगस्ट २०२४ ते ०२ सप्टेंबर २०२४ पहिला टप्पा पूर्ण झाला.
घोंगडी बैठकीचा दुसरा टप्पा १३ सप्टेंबर २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ घोंगडी बैठकीचा तिसरा टप्पा पिंपरी विधानसभा व भोसरी विधानसभा मतदार संघात १६ ऑक्टोंबर २०२४ ते १९ आक्टोबर २०२४ दरम्यान घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात ६ वक्ते सहभागी झाले होते. घोंगडी बैठकीच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान आणि ओबीसीसाठी केलेल्या कामासंदर्भात माहिती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. घोंगडी बैठकीचा महाराष्ट्रातील ८० विधानसभा मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
घोंगडी बैठकांतून घेतलेले मुद्दे
१) बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचार .
२) आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांचे गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान.
३) महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात राज्यासाठी घेतले गेलेले महत्वपूर्ण निर्णय आणि भूमिका.
४) या महाराष्ट्रातल्या संत थोर पुरूषांच्या आत्मचरित्राचा सत्ताधा-यांनी केलेला घोर अवमान.
५) आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत झालेली गद्दारी, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला मदमस्त सत्ताधा-यांनी लावलेली काळीमा.
६) ओबीसींचे अराक्षण टिकवण्यासाठी तसेच समाजातल्या सर्वागीण घटकांच्या विकासासाठी आवश्यक असलेली जातीनिहाय जनगणना, ही आपल्या पक्षाची ओबीसी प्रर्वगातील उपेक्षित घटकांसाठीची प्रमुख मागणी.
७) विश्वकर्मा समाजासाठी असलेले आर्थिक महामंडळ तथा कुंभार समाजाला आश्वासित केलेले मातीकला बोर्ड तर नाभिक समाजाला आश्वासित केलेले केश शिल्पी संस्था कर्तनालय बोर्ड किंवा महाज्योती संस्था अश्या व इतर महामंडळांच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील घटकांना आवश्यक असलेली आर्थिक निधी राज्य सरकारकडून पुरवला जात नाही.
८) राज्यातील बिघडलेल्या परिस्थितीत सामाजिक सलोखा राखण्याच्या आणि सामाजिक ऐक्य टीकवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाची भूमिका.
९) सत्ताधा-यांच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील शेवटच्या घटकांच्या मनात राज्यसरकारच्या बददल कमी होत चाललेली विश्वासार्हता आणि वाढत चाललेली असहिष्णूता
१०) ओबीसी प्रवर्गातील दुर्लक्षित घटकांना अठरा पगड जातींना पक्ष संघटनेसोबत जोडणे.
११) स्थानिक पातळीवर करण्यात आलेली समाज उपयोगी कामे जनसामान्यांपर्यत पोहोचवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांची नाळ सर्वसामान्य लोकांसोबत घट्ट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तसेच सामाजिक ऐक्यासाठी गावागावात लोकांमध्ये संवाद घडवून आणला गेला .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल जाधव शहराध्यक्ष ओबीसी सेल यांच्या नेतृत्वामध्ये ४ दिवसाची शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांची वारी गावच्या पारावरी ही संकल्पना घेऊन प्रदेश वरून प्रमुख वक्ते अविनाश रेणके व प्रकाश चव्हाण, अरुण तोडकर, विशाल जाधव यांनी पिंपरी विधानसभा व भोसरी विधानसभा मतदार संघात साधारणता तीस ते पस्तीस घोंगडी बैठका घेऊन शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार व पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांनी गेले ५५ वर्ष केलेला कार्याचा अहवाल जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्याचे काम केले सदर संकल्पनेसाठी बाळासाहेब शिंदे वरिष्ठ उपाध्यक्ष ओबीसी विभाग, सागर भुजबळ उपाध्यक्ष, संतोष माळी भोसरी विधानसभा अध्यक्ष, सुनील म्हेत्रे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, अरुण थोपटे सेवादल अध्यक्ष पिंपरी चिंचवड, ग्राहक संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष सुशांत खुरासाने यांच्या सहकार्याने दोन्ही विधानसभेमध्ये यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
भोसरी विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे यांच्या सहकार्याने विविध भागात घोंगडी बैठकीच्या आयोजन करण्यात आले. माननीय अविनाश रेणके साहेबांनी शेतकरी कष्टकरी व कामगार यांच्या व्यथा मांडून सध्या असलेले मिंदे व मोदी सरकारांबद्दल सडेतोड भाष्य करून येत्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची अशी मतदारांकडून ग्वाहीच घेतली. भोसरी विधानसभेत काम करत असताना माजी आमदार विलास लांडे यांनीही मुख्य वक्त्यांची भेट घेऊन त्यांना योग्य अशा विधानसभेच्या सूचना केल्या.
पिंपरी विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार दीपक रोकडे यांच्या सहकार्याने मुस्लिम समाज, बहुजन समाज, एस सी, एस टी समाजाच्या विविध भागात माननीय पवार साहेबांचे विचार पोहोचवण्याचे काम प्रकाश चव्हाण या वक्त्यांनी केले. पिंपरी विधानसभेत काम करत असताना माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी मुख्य वक्ते त्यांची भेट घेऊन त्यांचाही यथोचित असा सन्मान केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!