महाराष्ट्रसामाजिक
सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मुंबई येथे एल्गार मेळाव्याचे आयोजन..

युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात व युवक प्रदेश अध्यक्ष डाॅ. निलेश विश्वकर्मा यांच्या अध्यक्षते खाली एल्गार मेळावा आयोजित केला आहे. दि.०३ मे २०२३ रोजी, दुपारी १२:०० वा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे खैरलांजी, भीमा कोरेगाव, रमाबाई आंबेडकर नगर प्रकरण, ३ जाने. बंद, मराठा क्रांती मोर्चा किंवा कुठल्याही राजकीय, सामाजिक आंदोलना मधील गुन्हे दाखल असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी आपल्या गुन्ह्याच्या माहिती सोबत “युवा एल्गार मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे वंचित बहूजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.



