आरोग्यशहरसामाजिक

पवानाधरणाच्या आजू-बाजूला बेकायदेशीर व्यवसाय उभा करून पिण्याच्या पाण्याचे प्रदुषण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी-हौसराव शिंदे

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या परिसरात अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय उभे करून त्यामधे शौचालय बांधून त्याचे मलमुत्र पवना धरणात तसेच पवना नदी पात्रात सोडून दिले आहे. पिंपरी चिंचवड शहरवासीयांना अशुद्ध आणि मलमूत्र युक्त पाणी प्यावे लागत आहे. त्याला सर्वस्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे सर्व पिंपरी चिंचवड शहरवाशीयांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला पाहीजे. या संदर्भात आपण आयूक्तांना पत्र दिले आहे.
यात ते लिहितात “आपणांस उपरोक्त विषयासंदर्भात निवेदन देण्यात येते की, पिंपरी चिंचवड शहरासाठी पिण्याचे पाणी म्हणून पवना धरणाचा पाण्याचा वापर होतो. ते पाणी शुद्ध नसून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या आरोग्यास बाधा होईल. अशा प्रकारचे
प्रदूषण पवना धरणाच्या जलाशयाच्या आजू-बाजूचे स्थानिक मंडळी कॅम्पनिंग कन्सेप्ट राबवित आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी धरणाच्या पाण्यात सोडले जाते.
सदर जलाशायाच्या आजूबाजूस ७०० कॅम्प असून प्रत्येक कॅम्पवर आठवड्यातून दोनदा किमान तीनशे पर्यटक येतात कॅम्पवर कोणीही सेफ्टी टँक न करता सरळ मलमूत्र पाण्यामध्ये ड्रेनेज द्वारे पाणी सोडले जाते. एका व्यक्तीचे २५० ग्रॅम शौच धरल्यास एकूण
मलमुत्राची बेरीज केल्यास पिंपरी चिंचवडकर शुद्ध पाणी पितात कि मलमुत्र याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच पवाना नदिच्या तिराच्या बाजूकडील कंपन्या
या देखील ड्रेनेज पवाना नदिप्रवाहात सोडतात. नुकताच जलजिवन मिशन अंतर्गत झालेल्या सर्व्हेनुसार पवना नदिच्या उगमापासून संगमापर्यंत पिण्याचे पाणी योग्य नसल्याचे सांगण्यात आले तर शहरातील बहुतांश एस.टी.पी. प्रोजेक्ट बंद असल्याचे दिसून आले. सदर प्रकाराची गंभिर दखल घेवून आठ दिवसाच्या आत कार्यवाही न केल्यास मोठ्या प्रमणात शहरात जनजागृती करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा संघटनेमार्फत करण्यात येत आहे. असे आयु. हौसराव शिंदे (भारतीय रिपब्लिकन फेड्रेशन पिंपरी चिंचवड अध्यक्ष) बोलत होते या वेळी आयु. भिमराव गवळी
(सदस्य), आयु. अरुण मैराळे (युवक अध्यक्ष), आयु. अरुण रणदिवे (सदस्य) उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!