आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारका लगद सूरू असलेले मेट्रोचे काम सकल मातंग समाज बांधवांनी तात्काळ पाडलं बंद..

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. २३ नोव्हेंबर २०२४ साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पूर्णाकृती स्मारक निगडी येथील मेट्रोचे काम बंद पाडण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती अशी मिळाली आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या लगदची सीमा भिंत मेट्रोच्या कामामुळे तुटली असल्याने व त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला तडे गेल्याने यासर्व प्रकाराचे निषेधार्थ आज मेट्रोचे कामकाज मातंग समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले असल्याचे दिसून येते.
दरम्यान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची मेट्रो कडून विटंबना करण्यात आल्याचे मातंग समाज बांधव बोलताना दिसत आहे. या मूळे तात्काळ मेट्रो व संबंधित अधिकारांवरती पोलीस कारवाई करण्याची मागणी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली. संबंधित मेट्रोच्या अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी उडवडीची उत्तरे दिलेली आहे. तसेच महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप व माजी अध्यक्ष अरुणजी जोगदंड यांना मेट्रोचे अधिकारी सोनवणे यांनी तुम्ही यात लक्ष घालू नका अन्यथा आम्ही बघून घेऊ अशा प्रकारचे धमकी दिल्याचे अरुण जोगदंड यांनी सांगीतले, या निंदनीय कृतीचा निषेध करून निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी साहेब यांना भेटून संबंधितावरती तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याचे यूवराज दाखले यांनी सांगीतले.
यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आढागळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष नितीन घोलप, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती माजी अध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गट युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, संजय ससाने, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती माजी अध्यक्ष तथा स्वप्नपूर्ती ग्रुप अध्यक्ष डी. पी. खंडाळे, रामदास कांबळे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बाबासाहेब पाटोळे, शंकर खवळे, शिवाजी साळवे, स्वप्नील वाघमारे, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, माणिकराव पौळ, शंकर खवळे, माथाडी कामगार नेते आबासाहेब मांढरे, राजु आवळे, राजू चव्हाण यांच्यासह शेकडो प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह व मेट्रोचे मुख्य व्यवस्थापक आयुक्त श्रावण हर्डीकर साहेब यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तात्काळ पाहणी करण्याकरता बीआरटीचे व्यवस्थापक प्रमोद ओबांसे साहेब यांना पाहणी करण्याकरता पाठविण्यात आले.
त्याचबरोबर मेट्रोचे आयुक्त आदरणीय श्रावण हार्डेकर साहेबांना तात्काळ सकल मातंग समाजाचे प्रदेश समन्वयक युवराज दाखले यांनी संपर्क साधून त्यांना संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काढून टाकण्यासंदर्भामध्ये विनंती केली आणि संरक्षण जाळी उभारल्याशिवाय सेफ्टी उभारल्याशिवाय कामकाजाला सूरूवात करू नये अशी विनंती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!