Uncategorized
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी शिवाजी मधुकर खडसे यांची नियुक्ती जाहीर
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २७ नोव्हेंबर २०२४ शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे यांच्या सूचनेने पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शिवाजी खडसे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजी खडसे यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, महिला भगिनी यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना व विनंती दाखले यांनी करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.